विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
काही महिन्यापूर्वी ब्राझीलमध्ये कोरोनामुळे हाहाकार माजला होता. परंतु येथील सेरेना शहराने लसीकरणाद्वारे कोरोना विषाणूचा पराभव करून संपूर्ण जगासमोर एक नवा आदर्श निर्माण केला आहे. प्रशासनाने शहरातील सर्व प्रौढांना लस देऊन कोरोनाचा वेग थांबविला आहे.
विशेष महत्वाची बाब म्हणजे जगभरात सर्वात भयानक वाटणारे कोरोनाचा ब्राझिलियन प्रकार देखील या शहरात पसरला नाही. साओ पाउलो प्रांतात असलेल्या या शहराची लोकसंख्या सुमारे ४५ हजार असून यात सुमारे ३० हजार प्रौढ आहेत. पायलट प्रकल्पाचा एक भाग म्हणून लसीकरणासाठी या शहराची निवड करण्यात आली. इथली लोकसंख्या या प्रकल्पासाठी सर्वात योग्य होती, कारण इथली रुग्णांची आकडेवारीही उपलब्ध होती.
या प्रकल्पाचे समन्वयक आणि सेरेना राज्य रुग्णालयाचे संचालक, मार्कोस बोर्गेस म्हणाले की, जुलै २०२० मध्ये सेरेनामधील पाच टक्के लोकांनी कोरोनाची लागण झाली होती, म्हणजे दर २० पैकी एक जण संक्रमित झाला. या प्रकल्पाला साऊ पाउलो प्रशासनाने अर्थसहाय्य दिले. त्यामुळे
९५.७ टक्के लोकांना लस देण्यात आली
याचे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष झैरे बोलोसानो यांनी जाहीरपणे कौतुक केले. लसीकरणानंतर रुग्ण प्रकरण कमी झाले. २८ मार्चनंतर लसीकरणामुळे संक्रमित लोकांची संख्या कमी होऊ लागली. वास्तविक या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात संसर्गाचे प्रमाण शिगेला पोहोचले होते, ते नंतर कमी झाले आहे. त्यामुळे आता या शहराने कोरोनाला हरवत दुसऱ्यांना प्रेरणा दिली आहे