मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय नौदलातून सेवानिवृत्त झालेल्या आयएनएस विक्रांत या युद्धनौकेचे प्रकरण सध्या राज्यभरात गाजते आहे. ही नौका भंगारात जाऊ नये यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ५८ कोटी रुपये जमा करुन ते हडपल्याचा आरोप शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर, केवळ ११ हजार रुपयांचा निधी जमा केल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, न्यायालयात सोमय्या यांच्या वकीलाने धक्कादायक माहिती दिल्याचे समोर आले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने माहिती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, सोमय्यांचे वकील न्यायालयात म्हणाले की, राजभवनाचे बँक खाते नसल्याने आयएनएस विक्रांतसाठी गोळा करण्यात आलेला निधी भारतीय जनता पक्षाला देण्यात आला असे वकीलाने सांगितले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलीच टीकेची झोड उठवली आहे. हा म्हणजे गैरकारभारच अस जनतेचे पसे हडपण्याचा हा प्रकार आहे. यासंदर्भात भाजप सोमय्यांवर कोणती कारवाई करणार असा प्रश्नही राष्ट्रवादी काँग्रसने उपस्थित केला आहे.
https://twitter.com/NCPspeaks/status/1513773811262693384?s=20&t=ot_vhi4QhssZNoW6Txmp-Q