मुंबई – टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) कंपनीतर्फे भारतीय बाजारात सर्वाधिक खप असलेल्या Innova Crysta च्या नव्या मर्यादित आवृत्तीचे अनावरण करण्यात आले आहे. दिवाळापूर्वी आलेल्या इनोव्हामध्ये कंपनीतर्फे काही विशेष फिचर्सचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे रेग्युलर मॉडेल असलेल्या इनोव्हापेक्षा ही अधिक चांगली ठरत आहे.
Toyota Innova ही कार आपल्या सेग्मेंटमधील सर्वाधिक खप असलेली एमपीव्हीपैकी एक आहे. कंपनीतर्फे या कारचे २००५ मध्ये अनावरण करण्यात आले होते. त्यानंतर कार अनेकदा अपडेट करण्यात आली आहे. आतापर्यंत या एमपीव्हीच्या ९ लाखहून अधिक वाहनांची विक्री झालेली आहे. सात सीट असलेल्या या एमपीव्हीमध्ये कॅप्टन आणि बेंच दोन्ही सीटचा पर्याय आहे.
हे आहे खास
आधी सांगितल्याप्रमाणे या मर्यादित आवृत्तीत कंपनीतर्फे काही नवे फिचर्ल जोडण्यात आले आहेत. जसे, रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत यामध्ये तुम्हाला मल्टी-टेरेने मॉनिटर (३६० डिग्री कॅमेरा), हेड-अप डिस्प्ले, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम, वायरलेस चार्जर, डोअर एड्ज लाइटिंग (६ वेगवेगळ्या लाइटिंगसह) एअर ऑयोनाइजर आदी फिचर्समुळे ही कार आणखी विशेष ठरते.
इनोव्हा क्रिस्टाचे स्टँडर्ड फिचर्ससुद्धा या कारमध्ये आहेत. त्यामध्ये कोणतचा बदल करण्यात आलेला नाही. यामध्ये टचस्क्रिन इन्फोटेंन्मेंट सिस्टिमसाठी अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, डायमंड कट, अलॉय व्हील, कॅबिनमध्ये अॅम्बिएंट लाइटिंग, ७ एअरबॅग, स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट एसिस्ट, क्रूझ कंट्रोल, ड्राइव्हिंग मोड्स (पावर आणि इको) यासारखे फिचर्स असतील.
इंजिन क्षमता
पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायांसह Innova Crysta उपलब्ध आहे. तिच्या पेट्रोल व्हर्जनमध्ये कंपनीतर्फे २.७ लिटर क्षमतेचे पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तर २.४ लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन देण्यात आले आहे. हे दोन्ही इंजिन ५ स्पीड मॅन्युअल आणि ६ स्पीड मॅन्युअल ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गेअरबॉक्ससह मिळतात. Innova Crysta च्या मर्यादित आवृत्ती पॅकेज (सणांची ऑफर) फक्त डिलरशिपवर स्टॉक संपेपर्यंत ऑफर केले जाणार आहे. ही ऑफर आवडल्यास ग्राहकांना जवळच्या टोयोटा डिलरशिप शोरूमला जावे लागेल.