इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अतिशय खडतर आणि पवित्र समजली जाणारी अमरनाथ आता तुम्हाला घरबसल्याच करता आली तर. हो अमरनाथ श्राईन बोर्डाने तसा निर्णय घेतला आहे. बाबा अमरनाथचे ऑनलाईन दर्शन आणि पुजा या सुविधा आता ऑनलाईनच उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या विषयी आपण आता सविस्तर जाणून घेऊया..
भारतीय संस्कृतीत हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाणारे तीर्थक्षेत्र म्हणजे अमरनाथ होय. जम्मू – काश्मीर राज्यात हे पवित्र तीर्थस्थळ असून येथे नैसर्गिक गुहा आहे. ही गुहा श्रीनगर पासून साधारणपणे १३५ किमी वर समुद्रसपाटी पासून १३,६०० फूट उंचीवर आहे. येथील गुहेमध्ये बर्फाचे शिवलिंग तयार होते. त्याचे दर्शन घ्यायला दरवर्षी उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस लाखो भाविक येथे भेट देतात.
भाविकांना घरी बसून बाबा बर्फानी यांचे दर्शन, पूजा आणि हवन करता येणार आहे. श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने भाविकांच्या सोयीसाठी आणि उत्तम अनुभवासाठी ऑनलाइन व्यवस्था केली आहे. भाविकांना ऑनलाइन प्रसादाची मागणीही करता येणार आहे. पवित्र गुहेत पुजारी भक्ताच्या नावाने अर्पण करतील. भोलेनाथाचा प्रसाद भाविकांच्या दारात पोहोचणार आहे.
बोर्डाचे सीईओ नितीश्वर कुमार यांनी माहिती दिली की, बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवरून संबंधित अर्जाशी लिंक करून ऑनलाइन सेवांचा लाभ घेता येईल. ११०० रुपये भरून भाविक ऑनलाईन (आभासी) पूजेत सामील होऊ शकतात. त्याचप्रमाणे श्री अमरनाथजीचे ५ ग्रॅम चांदीचे नाणे प्रसाद बुकिंगमध्ये ११०० रुपयांना, प्रसाद बुकिंगमध्ये १० ग्रॅम चांदीचे नाणे २१०० रुपयांना आणि विशेष हवन किंवा प्रसाद आणि आभासी पूजा यांचे देगा देणगी शुल्क ५१०० रुपयांना उपलब्ध असेल.
या पवित्र गुहेतील पुजारी भक्ताचे नाव आणि गोत्रासह वैदिक मंत्र, श्लोक यांचे जप करून पूजा किंवा हवन करतील. उपलब्ध तंत्रज्ञान आणि डिजिटायझेशनचा वापर करून, भक्ताला Jio Meet अॅपद्वारे व्हर्च्युअल ऑनलाइन रूममध्ये पाठवले जाईल, ज्यामध्ये ते भाविक भगवान शिवाची विशेष पूजा आणि दर्शन करू शकेल. त्यामुळे ४८ तासांत टपाल विभागामार्फत भाविकांच्या घरी प्रसाद पोहोचवला जाईल.
विशेष म्हणजे बुकिंग केल्यानंतर, मंडळ नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडीवर लिंक आणि तारीख व वेळ शेअर करेल. हे पोर्टल श्री अमरनाथ श्राइन बोर्डाने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, जम्मू व काश्मीरच्या मदतीने विकसित केले आहे. ३० जूनपासून भाविक काश्मीरच्या हिमालयीन भागात असलेल्या बाबा अमरनाथ धामला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत .
यंदा अमरनाथ यात्रा दि. ११ ऑगस्टपर्यंत म्हणजेच रक्षाबंधनापर्यंत चालणार आहे. बाबा बर्फानी या नावाने प्रसिद्ध असलेल्या अमरनाथ धामचा इतिहास शतकानुशतके जुना आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, भगवान शिवाने अमरनाथ गुहेतच माता पार्वतीला अमरत्वाचे रहस्य सांगितले. दरवर्षी बाबा अमरनाथ धामच्या दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक येतात.
बाबा अमरनाथ धामची यात्रा दोन वर्षांनंतर सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी शिवभक्तांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. यावर्षी मोठ्या संख्येने भाविक बाबा अमरनाथच्या दर्शनासाठी येतील, अशी श्राइन बोर्डाची अपेक्षा आहे. त्यादृष्टीने प्रशासनही तयारीला लागले आहे. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून अमरनाथ यात्रेवर बंदी घालण्यात आली होती.
बाबा अमरनाथची गुहा प्रचंड उंचीवर आहे. गुहेत असलेल्या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे ते आपोआप तयार होते. असे म्हटले जाते की चंद्राचा वाढला किंवा कमी झाला की, त्याच्या शिवलिंगाचा आकार बदलतो. अमरनाथचे शिवलिंग घन बर्फापासून बनलेले आहे. तर ज्या गुहेत हे शिवलिंग आहे, त्या गुहेत हिमकणांच्या रूपात बर्फ आहे.
बाबा अमरनाथ धामची यात्रा दोन मुख्य मार्गांनी केली जाते. त्याचा पहिला मार्ग पहलगाम आणि दुसरा सोनमर्ग बालटाल येथून बनवला आहे. भाविकांना पायीच हा मार्ग पार करावा लागतो. पहलगाम ते अमरनाथ हे अंतर अंदाजे २८ किलोमीटर आहे. हा मार्ग थोडा सोपा आणि अधिक सोयीस्कर आहे. बालटाल ते अमरनाथ हे अंतर सुमारे १४ किलोमीटर आहे, पण हा मार्ग पहिल्या मार्गापेक्षा अवघड आहे.
Inline Darshan and Puja Facility of Amarnath details