मंगळवार, सप्टेंबर 23, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

मविप्र संस्थेच्यावतीने सुरू होणार ही नवी महाविद्यालये… अशा आहे भविष्यातील योजना…

by Gautam Sancheti
सप्टेंबर 8, 2023 | 9:55 pm
in स्थानिक बातम्या
0
mvp

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षण ही एक निरंतर प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षणाची गरज असते. बदलत्या काळाबरोबर विद्यार्थ्यांना अद्यावत विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे त्यांना करिअरच्या नव्या दिशा मिळाव्या,त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा म्हणून संस्थेने केंद्र सरकारची संस्था असलेल्या IISER या संस्थेबरोबर संस्थेतील विज्ञान आणि गणित शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी एक सामंजस्य करार केलेला आहे, त्या अंतर्गत संस्थेतील शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आल्याची माहिती मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. .यावेळी आयुर्वेद , हॉर्टीकल्चर ,पशुवैद्यक ,दंत वैद्यक महाविद्यालये भविष्यात सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मविप्र विद्यापीठ उभारणार असल्याची योजनाही असल्याच ते म्हणाले.

यावेळी त्यांनी सांगितले की,संस्थेतील सगळ्याच शिक्षकांचे सातत्याने प्रबोधन आणि प्रशिक्षण होणे आवश्यक असल्याने HRD सेंटरच्या वतीने सगळ्या शिक्षकांचे प्रशिक्षण संस्था पातळीवर सुरू करण्यात आले आहे. त्यातून संस्थेविषयीची आस्था सामाजिक बांधिलकी, नवे ज्ञान, सत्यशोधक विचार विकसित मदत होते. मराठा विद्या प्रसारक ही संस्था समाजाच्या मालकीची आहे. समाजाला तिचा उपयोग व्हायला हवा असे वाटणे साहजिक आहे, परंतु बदलत्या परिस्थितीत सगळ्या इच्छुकांना रोजगार देणे संस्थेच्या आवाक्याबाहेरील आहे. त्यासाठी संस्थेने बॉश म्हणजेच मायको या संस्थेबरोबर आयटीआय व डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी एक सामंजस्य करार केला आहे. या करारा अंतर्गत या विद्यार्थ्यांना समाज उपयोगी व रोजगारक्षम प्रशिक्षण देण्यात येते शिवाय हे प्रशिक्षण सुरू असताना त्यांना Stipend देखील दिले जाते यासाठी सभासदांच्या मुलांना विशेष प्राधान्य दिले जाते.

काळाबरोबर होत असलेले बदल स्वीकारणे ही आपल्या सगळ्यांचीच अपरिहार्यता आहे व गरजही आहे. त्यातूनच संस्थेने नवीन शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू करायला प्राधान्य दिले आहे. त्यामध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या विषयांना सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय अनेक विषयांचे प्रवेश क्षमतेत वाढ झालेली आहे. लवकरच संस्था आयुर्वेद महाविद्यालय, पशुवैद्यकीय महाविद्यालय सैनिकी प्रशिक्षण वर्ग सुरू करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

ही माहित सुध्दा दिली
१. आपल्या बहुतांशी सभासदांचे उपजीविकेचे साधन शेतीवर अवलंबून आहे पण सध्याच्या परिस्थितीत शेतीशी निगडित जोडधंदे केले तरच त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. संस्थेच्या माध्यमातून पुढील काळात सभासदांना कौशल्य विकास ,विविध उद्योगांची माहिती देणे ही आपली त्यांच्या प्रती एक जबाबदारी असेल .
२. बऱ्याचशा कॉलेजचे इमारतीचे पूर्णत्वाचे दाखले किंवा जागे संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता नसल्यामुळे विस्तार करण्यासाठी अडथळे निर्माण होत असल्याने विद्यमान कार्यकारिणीने प्राधान्याने कार्यवाही सुरू करून पूर्तता केली आहे.
३. संस्थेचे जगभर पसरलेले माजी विद्यार्थी ही संस्थेची संपत्ती आहे. दुर्दैवाने त्यांची एकत्रित माहिती आपणाकडे नसल्यामुळे संस्थेचा व माजी विद्यार्थ्यांचा connect तुटला आहे .अनेक विद्यार्थ्यांनी संस्थेचे ऋण व्यक्त करण्याची भावना व्यक्त केली आहे.या विद्यार्थ्यांना संस्था पातळीवर व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी मविप्र माजी विद्यार्थी संघटना स्थापन करण्यात येत असून त्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांचा हातभार संस्थेच्या विकासासाठी करून घेतला जाईल.

४.ज्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या इमारतींना ३०-३५ वर्ष झाले आहेत, त्यांची परिस्थीती फार बिकट आहे काही इमारती धोकादायक या श्रेणीतील असल्याने, या सर्व शाळांचे बांधकाम पुढील काही वर्षांत संस्थेला करणे गरजेचे आहे, मात्र त्यासाठी संस्थेकडे कुठल्याही प्रकारच्या निधीची तरतूद करण्यात आलेली नाही, हा निधी कशाप्रकारे उभा करायचा याच्यावर विचार विनिमय होणे गरजेचे आहे .
५.मागच्या काळात काही विशिष्ट आणि अनावश्यक बांधकामावार वारेमाप खर्च करण्यात आला , परंतू शाळांमध्ये अद्यावत इमारती, Toilets अथवा clean drinking water असे गरजेच्या Infrastructure कडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले. आजही संस्थेच्या काही शाळा भाडेतत्वावरील जागेत, मंदिरात, घरात आणि गोठ्यात भरत आहेत.
६. सभासदांच्या तसेच त्यांच्या परिवारातील सदस्यांचा संस्थेकडून खूप अपेक्षा आहे. नोकरी साठी रोज च ५०-१०० अर्ज येतात. संस्था स्तरावर आपण किती नोकऱ्या देऊ शकणार ? यापुढील काळात संस्था स्तरावर Recruitment Cell च्या माध्यमातून industry मध्ये किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी या सर्वांना रोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार आहोत.

ट्रेनिंग

  • भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था पुणे (IISER) ,MSFDA व मविप्र संस्था यांच्या दरम्यान विज्ञान व गणित विषयांच्या शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार
  • Bosch कंपनीच्या (Artisan Training Centre ) कडून long term आणि short term अशा कालावधीचे कोर्सेस घेतले जातात. Long term कोर्सेस नंतर १०० टक्के प्लेसमेंट ची हमी दिली जाते. बाहेर ५० हजार रुपयांपर्यंत फी असणारे हे कोर्सेस आपण आपल्या विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले आहेत.प्रत्येक विद्यार्थ्याला प्रशिक्षण काळात ६ हजार रु.प्रतिमहिना स्टायपेंड दिले जाते. तसेच टूल कीट व गणवेश मोफत दिला जातो. पुढील वर्षात ह्या सेंटर मधून 1 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.
  • मानव संसाधन विकास केंद्राच्या वतीने (HRDC) शिक्षकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे,
    त्यामध्ये प्राथमिक,ज्युनिअर व सिनिअर महाविद्यालय (अंतर्गत केजी टू पीजी शिक्षकांना ) मिळून २२ बॅचेस मध्ये २७४२ शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले आहे. लवकरच माध्यमिक शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे. नवीन शिक्षणक्रम मान्यता / प्रवेशक्षमता वाढ
  • मेडिकल कॉलेज कॅम्पस येथे औषधनिर्माणशास्र (बी.फार्म.) पदवी महाविद्यालयास ६० प्रवेश क्षमतेसाठी मान्यता मिळाली आहे.
    कर्मवीर. ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात Artificial Intelligence (AI) आणि डाटा सायन्स या नवीन कोर्स करिता ६० प्रवेश क्षमतेस मान्यता मिळाली आहे.
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मविप्रच्या कृषी तंत्रनिकेतन विद्यालयास ४० विद्यार्थी संख्येसह मान्यता मिळाली.
    बी.फार्म अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ६० वरून १०० करण्यात यश आहे आले.
  • एम. फार्म अभ्यासक्रमाच्या फार्माकोलॉजी व फार्माकोग्नसी या विषयाची प्रवेश क्षमता ०४ वरुन ०९ करण्यात यश आले आहे.
  • कर्मवीर. ॲड. बाबुराव गणपतराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आय.टी.,कॉम्प्युटर व एम.बी.ए. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमता ६० वरून १२० ने वाढ झाली आहे.
  • संस्थेचे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. www.mvp.edu.in
  • संस्थास्तरावर IP CELL (Intellectual Property Rights) स्थापन करणार.
    ृ संस्था विकासासाठी देणगी व निधी उभारण्यासाठी CSR CELL स्थापन करणार.
  • संस्था स्तरावर Recruitment Cell च्या माध्यमातून industry मध्ये किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जास्तीत -जास्त रोजगार कसा मिळेल यासाठी प्रयत्न करणार. आर्थिक तपशील
  • एकूण फेडलेले कर्ज – २९ कोटी २१ लाख
  • संस्थेने ३१ कोटी रुपयांची बांधकामाची देणी दिली.
  • अशी एकूण ६० कोटी रुपयांची देणी आर्थिक वर्षात फेडली
  • मागील वर्षातील ठेवींच्या तुलनेत (८३ कोटी ०१ लाख ६७ हजार) या वर्षीच्या ठेवींमध्ये ६ कोटी ११ लाख ७६ हजार ४१७ रु.इतकी वाढ झाली.
  • विनाअनुदानित तत्वावरील सेवकांच्या वेतनात वाढ…
  • संस्थेतील एकूण १२८१७ सेवकांपैकी ८२३२ सेवक विनाअनुदानित तत्वावर काम करतात.
  • विनाअनुदानित सेवकांच्या वेतनापोटी संस्था दरवर्षी सुमारे १६५ कोटी २२ लाख खर्च करते.
  • २०२३ -२४ पासून त्यात सुमारे २१ कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे.

भविष्यातील योजना…
१)मविप्र विद्यापीठ उभारणार.
२) IBM सोबत सामंजस्य करार करणार.
३) Oxford सोबत सामंजस्य करार करणार.
४)५० वर्षे पूर्वीच्या सर्व धोकादायक इमारती नव्याने बांधणार.
५)आयुर्वेद / हॉर्टीकल्चर / पशुवैद्यक / दंत वैद्यक महाविद्यालये सुरु करणार.
६)मिल्ट्री प्रीपेटरी स्कूल स्थापन करणार.
७)एन.डी.ए. ट्रेनिंग सेंटर सुरु करणार. NDA Early – NDA Advance
८) १३ मजली अद्ययावत मुलांचे वसतीगृह (उदाजी मराठा कॅम्पस) उभारणार.
९) मध्यवर्ती कार्यालयासमोरील पार्किंग जागेत बहुमजली पार्किंगसह भव्य बहुउद्देशीय वास्तूचे बांधकाम करणार.
१०)मॅरेथॉन चौकात आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत यांचा पूर्णाकृती पुतळा बसविणार.

११)मध्यवर्ती कार्यालयाच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्याचे बांधकाम करणार.
१२)कर्मवीर अॅड.बाबुराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालय आवारात वर्कशॉप व कॅन्टीन बांधणार.
१३)नवीन उद्योजक घडविण्यासाठी उद्योजक शिबिरांचे आयोजन करणार.
१४)सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करणार.
१५) छत्रपती शिवाजी महाराज मराठा संशोधन आणि अभ्यास केंद्र स्थापन करणार.(Chatrpati shivaji Maharaj centre for Maratha research and study)

Nashik Education Maratha Vidya Prasarak Sanstha
Institute Future Plan Colleges Nitin Thakare

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींनी आज दिरंगाई करु नये… जाणून घ्या, शनिवार, ९ सप्टेंबर २०२३चे राशिभविष्य…

Next Post

मनोज जरांगेंच्या आईने दिली आंदोलनस्थळाला भेट… मराठा आरक्षण आणि मुलाबाबत म्हणाल्या…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी कोणतेही कार्य करताना दक्षता बाळगावी, जाणून घ्या, मंगळवार, २३ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 22, 2025
पॉड टॅक्सीबाबत आयोजित बैठक 2 1024x548 1
महत्त्वाच्या बातम्या

आता ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा…परिवहन सेवेचे पुढचे पाऊल

सप्टेंबर 22, 2025
IMG 20250922 WA0409
महत्त्वाच्या बातम्या

आता आदर्श शैक्षणिक कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यास मिळणार इतक्या कोटींचा पुरस्कार

सप्टेंबर 22, 2025
crime 1111
क्राईम डायरी

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच….वेगवेगळया भागात पार्क केलेल्या दोन मोटारसायकली चोरीला

सप्टेंबर 22, 2025
IMG 20250922 WA0388 1
महत्त्वाच्या बातम्या

नवरात्र उत्सवानिमित्त मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कोटमगाव जगदंबा मातेचे दर्शन….

सप्टेंबर 22, 2025
rain1
संमिश्र वार्ता

या तारखेदरम्यान राज्यात पावसात वाढ होण्याची शक्यता…

सप्टेंबर 22, 2025
crime1
क्राईम डायरी

इमारतीतून चोरट्यांनी लिफ्टच्या बॅट-या चोरल्या…ओमकारनगर येथील घटना

सप्टेंबर 22, 2025
cm untold story4 1024x682 1
संमिश्र वार्ता

‘मेरा देश पहले- द अनटोल्ड स्टोरी ऑफ नरेंद्र मोदी’ कार्यक्रमात मोदीजींच्या जीवनाचे प्रेरणादायी पैलूंचे दर्शन…

सप्टेंबर 22, 2025
Next Post
F5gr LbWkAAUTju

मनोज जरांगेंच्या आईने दिली आंदोलनस्थळाला भेट... मराठा आरक्षण आणि मुलाबाबत म्हणाल्या...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011