विक्रम; २६७ सामन्यात विराट कोहलीने केल्या १३ हजार धावा
इंडिया दर्पण डेस्क
विराट कोहलीने इतिहास रचत वनडे क्रिकेटमधील ४७ वे शतक झळकावले. यासह विराट कोहलीने १३ हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात या १३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. विराट हा १३ हजार धावा पूर्ण करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. या आधी सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पॉटिंग आणि सनथ जयसूर्या यांनी १३ हजार धावांहून अधिक पूर्ण केल्या आहेत.
या अगोदर १३ हजार धावा पूर्ण करणारे हे खेळाडू आहे. त्यात सचिन तेंडुलकरने ३२१ सामन्यात, रिकी पॉटिंगने ३४१ सामन्यात, कुमार संगकाराने ३६३ आणि सनथ जयसूर्याने ४१६ सामन्यात १३ हजार धावा केल्या आहेत. विराट कोहली याने २६७ सामन्यात या धावा पूर्ण केल्या आहे.
आज विराट कोहली आणि केएल राहुल यांनी शतकी खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी २०० धावांची भागीदारी केली. आशिया कप स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धची ही भारताची मोठी भागीदारी आहे. पाकिस्तान विरुद्ध नाबाद २३३ धावांची भागीदारी केली.
Virat Kohli scored 13 thousand runs in 267 matches