मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बँक ऑफ महाराष्ट्रमधील खातेदाराची ३१ लाखांची फसवणूक; खातेदारांचे भिक मांगो आंदोलन

by India Darpan
सप्टेंबर 11, 2023 | 5:00 pm
in राज्य
0
IMG 20230911 WA0052

उरण (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रायग़ड जिल्हयातील उरण तालुक्यातील भेंडखळ गावच्या प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांचे बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखेत खाते होते. त्यांच्या खात्यावरील ३१ लाखांची रक्कम परस्पर काढून त्यांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संदर्भात उरण पोलीस ठाण्यात नवघर येथे असलेले बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचे कर्मचारी मकरंद भोईर व चेतन इंटरप्रायझेस यांच्या विरोधात २२ एप्रिल २०२३ रोजी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पोलिसांमार्फत तसेच बँकेशी संबंधित विभागा मार्फत तपास संथ गतीने चालू आहे. आरोपी मात्र फरार आहेत. त्यांच्यावर कोणतेही कडक कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही.

तब्ब्ल ४ महिने उलटूनही भेंडखळच्या प्रज्वला ठाकूर यांना न्याय न मिळाल्याने दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० वाजल्यापासून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवघर समोर प्रज्वला ठाकूर हे भिक मांगो आंदोलन करणार होत्या मात्र पोलीस प्रशासन व महाराष्ट्र बँकेने पैसे परत मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यामुळे २८ ऑगस्ट २०२३ रोजीचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. मात्र प्रज्वला ठाकूर यांना पैसे देण्यास बँक टाळटाळ करत असल्यामुळे तसेच पोलीस प्रशासन कोणतेही ठोस भूमिका घेत नसल्याने प्रज्वला ठाकूर यांनी बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखा येथे आज दिनांक ११ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून बँकेच्या गेट समोरच भिक मांगो आंदोलन सुरु केले आहे.

आंदोलनाचा आज पहिला दिवस असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे भिक मांगो आंदोलन असेच सुरु राहील असे प्रज्वला ठाकूर यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते जयंत गांगण,मिलिंद पाटिल सरपंच प्रतिनिधी,अभिजित देवांनंद ठाकूर ग्रामपंचायत सदस्य,दिपक दामोदर ठाकूर ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.बँकेचे मॅनेजर हे आजारी आहेत तर पोलीस अधिकारी श्री.हुलगे हे ट्रेनिंगला गेले आहेत त्यामुळे ते उरण मध्ये कामावर रुजू झाले नाहीत. मात्र त्यांना फोन द्वारे संपर्क केला असता त्यांचा फोनचा रिंग वाजतो मात्र ते फोन उचलत नाहीत. त्यामुळे शासकीय अधिकाऱ्यांकडुन योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही.पोलीस अधिकारी श्री. हुलगे व बँकेचे अधिकारी जाणून बुजून रजेवर तसेच ट्रेनिंगला गेल्या असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे.पीडित महिलेला न्याय देण्या ऐवजी अधिकारी सुट्टी वर तसेच ट्रेनिंग साठी जात असल्याने नागरिक व आंदोलन कर्त्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे .या आंदोलन स्थळी उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे,भाजप नेते तथा जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,उद्योजक विकास भोईर,बबन ठाकूर, राजन पाटिल आदींनी भेट देऊन आंदोलनाला जाहिर पाठिंबा दिला.

काय आहे प्रकरण :-
प्रज्वला ठाकूर (फिर्यादी )यांचे बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखा येथे बँक खाते आहे. त्यांनी मुलीच्या नावे २० लाख रुपयांची एफडी करावयाची असल्याचे सांगितले. एफडी करण्यासाठी बँक कर्मचारी मकरंद भोईर याच्यावर विश्वास ठेवून चेक बुक व पास बुक त्याच्याकडे दिले. त्यानंतर अनेक दिवस उलटूनही फिर्यादीला एफडी प्रमाणपत्र न मिळाल्याने त्यांनी २७/२/२०२३ रोजी बँकेत जाऊन विचारणा केली असता त्यांच्या खात्यावर अवघी २४ हजार सातशे अठ्ठेचाळीस इतकी रक्कम असल्याचे निदर्शनास आले.बँक मॅनेजर यांनी फिर्यादीला बचत खात्याचा तपशील समजवून सांगितला असता त्यांच्या खात्यावरील २० लाख दि. २७/६/२०२२ रोजी व रुपये १० लाख दि. २१/१०/२०२२ रोजी आरोपी चेतन इंटरप्रायझेस या खात्यावर जमा झाल्याचे दिसते. तर रुपये १ लाख दि. ६/१०/२०२२ रोजी आरोपी मकरंद भोईर याने काढून घेतल्याचे उघड झाले आहे. यावरून बँक कर्मचारी मकरंद भोईर व चेतन इंटरप्रायझेसचा खातेदार यांनी संगनमताने फिर्यादीची एकूण ३१ लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा उरण पोलीस ठाण्यात २२/४/२०२३ रोजी दाखल झाला आहे.

या प्रकरणी आरोपी विरोधात भादवी कलम ४२० व ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवराज सोनवणे यांनी तपास केला. आता तपास श्री. हुलगे यांच्याकडे आहे.बँकेतून एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम वर्ग करताना महाराष्ट्र बैंक नवघर शाखेच्या मॅनेजर किंवा इतर कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचे उघड होते, अन्यथा त्यांचा ही यामध्ये हात असल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे.दोषीवर त्वरित कायदेशीर कारवाई करून सदर रक्कम त्वरित मिळावे अशी मागणी प्रज्वला ठाकूर यांनी केली होती.

मात्र बँक प्रशासनाने पीडित व्यक्तीला न्याय द्यावयाच्या ऐवजी तिचे आर्थिक शोषण करून तीच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवघर येथे कर्मचाऱ्यांची मनमानी कारभार सुरु आहे. अशाच प्रकारची आर्थिक फसवणूक १५ ते २० बँक खातेदार असलेल्या व्यक्तींची झाली आहे.पण हे फसवणूक झालेले व्यक्ती आपली फसवणूक झाली आहे असे सांगण्यास पुढे येत नाहीत. त्यामुळे वारंवार ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नवघरच्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून सर्व व्यक्तींचे पैसे त्यांना त्वरित परत मिळावेत अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
31 lakh fraud of an account holder in Bank of Maharashtra; Account holders’ begging movement

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

धक्कादायक….सर्वोच्च न्यायालयाच्या महिला वकिलाची पतीनेच केली हत्या

Next Post

केंद्र सरकारने ई-लिलावात खुल्या बाजारात इतक्या लाख मेट्रिक टन गहू व तांदळाची केली विक्री

India Darpan

Next Post
wheat gahu

केंद्र सरकारने ई-लिलावात खुल्या बाजारात इतक्या लाख मेट्रिक टन गहू व तांदळाची केली विक्री

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011