इंडिया दर्पण वृत्तसेवा
नायजेरियात झालेल्या बोट अपघातात २६ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघात झालेल्या बोटीवर १०० हून अधिक लोक होते. त्यात २६ जणांचा मृत्यू झाला तरर ३० जणांना वाचविण्यात यश आले. अजून अनेक जण बेपत्ता आहे. नायजेरियातील नायजर प्रांतातील मोकवा येथे बोटीतून प्रवास करताना ही घटना घडली.
या घटनेनंतर नायजेरियाच्या नायजर राज्याच्या गव्हर्नरचे प्रवक्ते बोलगी इब्राहिम यांनी अपघात झालेल्या बोटीवर १०० हून अधिक लोक असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे बोटीत महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. या दुर्घटनेत प्राण गमावलेले आणि बेपत्ता झालेले लोक धरण ओलांडून आपापल्या शेतात जात होते.
30 जणांची सुटका करण्यात यश
या घटनेनंतर नायजर राज्य आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेच्या सहकार्याने सागरी पोलीस आणि स्थानिक गोताखोर पाण्यात बुडालेल्या लोकांचा शोध घेत आहेत. याअगोदर जुलै महिन्यात बोट दुर्घटनेत १०० जणांचा मृत्यू झाला होता. या आफ्रिकन देशात सर्वाधिक बोटींचे अपघात गर्दीमुळे आणि बोटींची देखभाल न केल्यामुळे होत असल्याचे बोलले जात आहे.
unfortunate events; 26 killed in boat accident in Nigeria