नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पुणे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळावा येथे महाराष्ट्र पोलीस दलातील २४ संघ सहभागी झालेले होते. सदर स्पर्धा आठवडाभर सुरू होती. या स्पर्धेत नाशिक शहर पोलीस दलात काम करणारे पोलीस अंमलदार दर्शन सोनवणे यांनी शास्त्रीय पध्दतीने गुन्हे तपास या विषयातील निरीक्षण प्रकारात महाराष्ट्र पातळीवर प्रथम क्रमांक मिळवत नाशिक शहर पोलीस दलास सुवर्ण पदक मिळवून दिले आहे..
त्यांना पोलीस आयुक्त नाशिक शहर, पो. उप आयुक्त गुन्हे, ACP गुन्हेसह वरीष्ठ अधिका-यांनी मार्गदर्शन केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील मुंबई शहर सह इतर २३ संघ सहभागी झाले होते. अंत्यत चूरशीच्या स्पर्धेत पोलीस अंमलदार दर्शन सोनवणे यांनी सुवर्णं पदक मिळवले आहे. या पुरस्कारामुळे नाशिक शहर पोलीस दलाची राज्यस्तरीय स्पर्धेत मान उंचावली असल्याचे पोलिस अधिका-यांनी सांगितले.
मॅक्स आणि गुगललाही पदक
पुण्यात झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत पोलीस दलातील श्वानांच्या कर्तव्य स्पर्धेमध्ये नाशिकच्या मॅक्स आणि गुगल या श्वानांनी नाशिक पोलिस आयुक्तालयासाठी चॅम्पियशिप पटकावली आहे. मॅक्सने अंमली पदार्थ स्पर्धेत सुवर्ण तर गुगलने गुन्हेशोध स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे.
पुण्यात रामटेकटी येथे राज्यस्तरीय पोलिस दलाताली श्वानांसाठीच्या १८ व्या महाराष्ट्र राज्य पोलिस कर्तव्य मेळाव्यात हे पदक मिळाले.
Nashik police officer Darshan Sonwane won the gold medal in this competition