नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिशनच्या वतीने आणि महाराष्ट्र ऍथलेटिकस असोसिएशनच्या मार्गरदर्शनाखाली आणि सहकार्याने नाशिकच्या स्व. मिनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलच्या सिंथेटिक ट्रॅक वर नाशिक जिल्हा ऍथलेटिकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली.
या स्पर्धेत १४ वर्षे मुले- मुली, १६ वर्षे मुले- मुली, १८ वर्षे मुले- मुली, २० वर्षे मुले- मुली, २३ वर्षे आणि वरिष्ठ गट पुरुष आणि महिला अशा सात वयोगटांचा समावेश आहे. या स्पर्धेत ८६८ खेळाडूनी सहभाग घेवून चांगला प्रतिसाद दिला. आज सकाळपासून सुरू असलेल्या विविध क्रीडा प्रकारामध्ये सकाळी लांब पळण्यांच्या स्पर्धा घेतल्या गेल्या यामध्ये पुरुषांच्या १०००० मिटर धावणे प्रकारात राहुल वाडेकरने ४४:०७:३० मिनिटामध्ये रेस पूर्ण करून विजय प्राप्त केला. पुरुषांच्या ५००० मिटर धावणे प्रकारात बंडू कोल्हे सर्वात आधी पूर्ण करून विजेतेपद मिळविले. मुलांच्या २३ वर्षे गटामध्ये किरण महालेने हे आंतर १९.०२.४० मिनिटात पूर्ण करून विजेतेपद मिळविले. मुलींच्या २३ वर्षे गटात फॅशा लोभीने हे आंतर २३:२९. ७० मिनिटामध्ये पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला. मुलांच्या २० वर्षे गटात एकलव्य अकादमीच्या ओम फडने पहिला,– के. टी. एच. एम. च्या दीपक गायकवाडने दूसरा आणि शौर्य बॉइजच्या मयूर ठाकरेने तिसरा क्रमांक मिळविला.
मुलींच्या २० वर्षे गटात राजीव गांधी स्कूलच्या आरती पावराने प्रथम, रनर्स-९९ क्लबच्या वेदिका मंडलिकने दुसरा क्रमांक मिळविला. पुरुषांच्या १५०० मीटर धावणे प्रकारात लासलगाव एन. व्ही, पी. कॉलेजच्या गोपाळ कानडेने ४:३०:४५ मीनिटामध्ये ही रेस पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळविला. पुरुषांच्या थाली फेकमध्ये विनायक शिंदेने ३१.९० मिटर थाली फेकून प्रथम क्रमांक मिळविला. महिलांच्या थाली फेक प्रकारात अमेरा शहाने सर्वात जास्त ३६.४७ मिटर थाली फेकून प्रथम क्रमांक मिळविला.
या स्पर्धेचे चांगल्या प्रकारे आयोजन करता यावे यासाठी सिग्नेचर इंटरनॅशनल फूड्स, आर. डी. इन्फ्रा ग्रुप, विक्रांत हॅप्पी होम प्रा. लि., हिमा शिपिंग सर्विसेस प्रा. लि. यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेत मुलांच्या पाच आणि मुलींच्या पाच गटात सर्वात जास्त पदके मिळविणाऱ्या खेळाडूला वैयक्तिक चॅम्पियनशिप चषक तर या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये सर्वात जास्त पारितोषिके मिळवणाऱ्या संघाला सांघिक विजेतेपद आणि उपविजेतेपदाचा चषक प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे खेळाडूंची नाशिक जिल्ह्याच्या संघामध्ये निवड केली जाणार असून हे खेळाडू आपल्या गटात राज्य स्पर्धेत नाशिक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नाशिक जिल्हा ऍथलेटिकस असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी, विजय पवार, प्रशिक्षक वैजयंत काळे, संदीप फुगट, बालाजी शिरफुले, संदीप वाघ आणि नाशिक जिल्हा ऍथलेटिक्स असोसिएशनचे सर्व खेळाडू परिश्रम घेत आहेत.
आजच्या स्पर्धेचा निकाल :-
१०,००० मिटर रन –पुरुष – १) राहुल वाडेकर- प्रथम
५००० मिटर रन –पुरुष – बंडू कोल्हे (३२:४६.५२ मिनिटे )
२३ वर्षे मुले – किरण महाले – (१९.०२.४० मिनिटे)
२० वर्षे मुले– ओम फड, एकलव्य (१६:३०.२०मिनिट्स) – प्रथम,
– ५००० मिटर रन –
मुली -२० वर्षे गट – आरती पावरा –राजीव गांधी स्कूल (१९.५१.२०मिनिट्स) – प्रथम,
लॉग जंप –
पुरुष – गौरव जगताप –एम. एस. जी. कॉलेज, मालेगाव (४.२४ मिटर)
मुले- २० वर्षे –१) श्रीजय पाटील –व्ही. डी. के. (५.७२ मिटर)
मुली – २० वर्षे –१)मनिषा कंगणे – रनर्स – ९९ (३.६२ मिटर)
गोळा फेक –
मुले- २० वर्षे- करण दराडे –व्ही. डी. के. (१०.९६ मिटर)
मुली- २० वर्षे –हेमागी पंडित – एस.एफ. टी. सी. स्पोर्ट्स क्लब (०८.५८ मिटर)
१०० मिटर – मुले-२३ वर्षे – यशवंत गुंजाळ – के. बी. एच. मालेगाव.(१०.९० सेकंद) मुले-२० वर्षे तेजस पाल – रनर्स-९९ क्लब,(११.५०सेकंद)
४०० मिटर रन – मुले २० वर्षे १) ऋतुराज नाले, नाशिक जिल्हा आथलेटिक्स (५५. २० सेकंद) मुली -२३ वर्षे – साक्षी दरेकर –रनर्स-९९ (१४.५५ सेकंद)
Nashik District Athletics (Field) Competitions begin with great enthusiasm