नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मधली होळी चौक भागात पाठलाग करीत एकाने रस्त्याने पायी जाणा-या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. याप्ररपणी किसन रमेश नागपूरे (२८ रा. कांडप यंत्रा समोर कुभांरवाडा,काझीगढी) या संशयिताला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत परिसरातील पीडित बालिकेने तक्रार दाखल केली आहे. शनिवारी (दि.९) सायंकाळच्या सुमारास पीडिता आपल्या घराकडे रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. पीडितेने या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर विनयभंगासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयिताने तिचा पाठलाग करीत बुधा हलवाई दुकानासमोर तिची वाट अडविली. यावेळी संशयिताने तिचा विनयभंग केला. पीडितेने घरी जावून आपल्या पालकांकडे आपबिती कथन केल्याने हा प्रकार पोलिसात पोहचला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खांडवी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten