नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरीरोडवरील वाढणे कॉलनी भागात गॅलरीतून पडल्याने ४७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. प्रकाश विठ्ठल सुर्यवंशी (रा.पुजा संकुल सोसा.वाढणे कॉलनी म्हसरूळ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सुर्यवंशी रविवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घराच्या गॅलरीतून तोल जावून पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाल्याने पत्नी ज्योती सुर्यवंशी यांनी त्यांना तातडीने नजीकच्या सिनर्जी हॉस्पिटल येथे दाखल केले होते.
उपचारादरम्यान डॉ.कल्पेश सुराणा यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत डॉ.सचिन बाविस्कर यांनी दिलेल्या खबरीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक फुलपगारे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten