नाशिक – उद्योग मित्र संस्था, नाशिक आणि पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे येथील INFOVISION LABS आयटी कंपनी साठी रामकृष्ण आयटी कन्सल्टिंग द्वारे कॅम्पस इंटरव्ह्यू ड्राईव्ह केला आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील पात्र उमेदवारांना चांगली नोकरीची संधी उपलब्ध होत आहे. ज्यांची शैक्षणिक पात्रता, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या शाखेतील बी.ई. अथवा MCA, MSC(Comp.Sc.) इत्यादी अभ्यासक्रम पूर्ण झालेला किंवा शेवटच्या वर्षात असलेले विद्यार्थी या मुलाखतीस पात्र आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ कंपनीचे नियुक्तीपत्र देऊन सहा महिन्याचे प्रशिक्षण (वर्क फ्रॉम होम विचारात घेऊन ) दिले जाणार आहे. या सहा महिन्याच्या प्रशिक्षणात मानधन सुद्धा दिले जाणार आहे. त्यानंतर पगार वार्षीक 4.5 +1 देण्यात येईल. तरी अशी पात्रता असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी या संधीचा ८ जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता पिव्हीजी कालेज कॅम्पस, 206, दिंडोरी रोड, रिलायन्स पेट्रोल पंप मागे, म्हसरूळ नाशिक येथे येऊन लाभ घ्यावा असे आवाहन उद्योग मित्र संस्थेचे अध्यक्ष प्रदीप पेशकार व समन्वयक अमित कुलकर्णी तसेच पीव्हीजी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग प्राचार्य ए.आर.रासने, व प्रा.संदीप दिवे यांनी केले आहे. अधिक माहीतीसाठी – 9822561464 / 8888887907 या फोन नंबरवर संपर्क करावा.