मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असून महागाईचा भडका उडला आहे. कारण वाहतूक खर्चात मोठी वाढ झालेली दिसून येते विशेषतः अन्नधान्य गहू , तांदूळ यांचे दर खूपच वधारले आहेत. रशिया-युक्रेन युद्धात अन्नधान्य महागाई शिखरावर आहे. तृणधान्ये देखील अपवाद नाहीत. स्थानिक बाजारपेठेत गव्हाच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. नाशिकच्या सिडको परिसरात गव्हाच्या दरात यंदा सुमारे 100 ते 150 रुपयांनी वाढ झाली. राशिया आणि युक्रेन हे गहू आणि सूर्यफूल उत्पादनांचा प्रमुख उत्पादक आणि निर्यातदार आहे. युद्धामुळे युक्रेनमधून होणारी निर्यात थांबली आहे. यानंतर परदेशातूनही भारतीय गव्हाला यंदा मागणी दिसून येत आहे.
नवीन गव्हाची आवक वाढण्याबरोबरच निर्यातही सुरू झाली आहे. यामुळे किंमतीत भरमसाठ वाढ होते. या वर्षी चांगल्या प्रतीच्या गहू गेल्या वर्षीच्या तुलनेत 500 ते 800 रुपये प्रति क्विंटलने महागेल, अशी शक्यता आहे. त्यामुळेच गव्हाचे दर हे तब्बल ४ हजार रुपये क्विंटल होण्याची दाट चिन्हे आहेत.
निर्यातीचा दबाव वाढण्याच्या अपेक्षेने शेतकरी अद्याप चांगल्या दर्जाचा गहू बाजारात आणत नसल्याचे बाजार समितीतील व्यापाऱ्यांचे मत आहे. वार्षिक संकलनासाठी गव्हाची मागणी एप्रिलपासून सुरू होईल. वाहनचालकांना अजूनही गहू मिळत नाही. अशा स्थितीत त्याचा हंगाम बिघडत असल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी सामान्य दर्जाचा गहू २७०० ते ३५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकला जाण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे लोकवन, एचएमटी सह सर्वोत्तम शरबती दर्जाच्या गव्हाचा भाव यंदा सुमारे ४०००ते ४५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचेल, असे गहू तांदूळ विक्रेते विलास सालासर यांनी संगीतले. सुमारे पंधरा दिवस गव्हाला निर्यातीसाठी जोरदार मागणी असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.