मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दररोजच्या स्वयंपाकात बहुतांश घरांमध्ये डाळींचा उपयोग केला जातो. वरण असो की कोणतीही भाजी तसेच अन्य पदार्थांमध्ये डाळीचा समावेश करण्यात येतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून डाळींचे भाव वाढले आहेत विशेषतः आता श्रावण महिन्यात सणासुदीच्या काळात डाळींबाचे भाव चढे असल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. तसेच सर्वसामान्यांच्या खिशाला भुर्दंड बसत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये कडधान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा मुसळधार पावसाने कडधान्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच गेल्या हंगामात डाळी बाजारपेठेत येऊ शकले नाही. केंद्र सरकार इतर देशातून डाळी आयात करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयात केल्यावरच डाळींचे चढे दर कमी होतील. मागील काही दिवसांत डाळींच्या दरात प्रतिकिलो १० ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत डाळींचे दर कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.
कडधान्याचे भाव गगनाला भिडले असून सुमारे मठ १५०, उडीद १३० तर मूगडाळ १२० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. मागील आठवड्यात डाळींच्या किमतीत प्रतिकिलो दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे. परतीच्या पावसाने कडधान्याचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मागणीच्या तुलनेत डाळींचा पुरवठा घटला आहे. केंद्र सरकारने डाळी निर्यात बंदी केल्या तरच दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
रोजच्या आहारातील प्रमुख घटक असलेल्या डाळींचे भाव कडाडले आहेत. वास्तविक हमीभाव वाढवल्यानं शेतकरीही डाळवर्गीय पीक लागवडीकडे वळालाय. त्यामुळे खरिपात डाळींचा पेरा गेल्यावर्षी पेक्षा वाढलाय. या वाढलेल्या पेऱ्यामुळे डाळींचं उत्पादनही वाढणार आहे. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 22 जुलैपर्यंत देशात 90 लाख 69 हजार हेक्टर क्षेत्रावर डाळींची लागवड झाली, गेल्या वर्षी डाळीची लागवड 85 लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावर झाली होती. असे असून देखील डाळीचे भाव वाढतच आहेत.
महाराष्ट्रात मराठवाडा व विदर्भात मोठ्या प्रमाणात कडधान्ये घेतली जातात. तसेच राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यांतूनदेखील डाळींचा पुरवठा होतो. मात्र यंदा जुलैत पावसाने राज्यात धुमाकूळ घातला. हातातोंडाशी आलेले कडधान्याचे पीक आडवे झाले. त्यामुळे बाजारपेठेत डाळींचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण होणार आहे. त्यात आता सणासुदीला मागणी वाढली असून पुरवठा घटला आहे. तूरडाळ, मूगडाळ, हरभरा डाळ, उडीद आदींच्या किमतींनी प्रतिकिलो शंभरी पार केली आहे.
होलसेल किराणा दुकानात साधारण: ११० ते १४० रुपये किलो दराने डाळींची विक्री होत आहे. अनेक दुकानदारांची भिस्त ही डाळींच्या जुन्या स्टॉकवरच आहे. एकाएकी दर वाढल्याने ग्राहकांना जादा पैसे मोजून डाळी खरेदी करावी लागत आहे. त्यावर पर्याय म्हणून काही ग्राहक नेहमीच्या तुलनेत कमी डाळ खरेदी करत आहेत. पुढील काळात डाळींच्या किमतीत आणखी वाढ झाल्यास सर्वसामान्यांच्या ताटातून डाळ गायब होण्याची चिन्हे आहेत. डाळीचे नवीन पीक बाजारात येईपर्यंत दर कमी होण्याची चिन्हे नसल्याची शक्यता व्यापार्यांनी वर्तवली आहे.
एकीकडे डाळीचे भाव वाढले आहेत, मात्र दुसरीकडे काहीप्रमाणात खाद्यतेलाचे दर स्वस्त झाल्याने ग्राहकांना थोडा का होत नाही दिलासा मिळाला आहे. रशिया, युक्रेन युद्ध आणि इंडोनेशियाकडून बंद करण्यात आलेल्या पाम ऑईल निर्यातीच्या पार्श्वभूमीवर भारतात खाद्यतेलाचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे खाद्यतेलाचे दर गगनाला भिडले होते. मात्र आता इंडोनेशियाने बंदी उठवली आहे, तसेच भारताने देखील आयात शुल्क कमी केल्याने खाद्यलेलाचे दर स्वस्त झाले आहेत. यंदाही वार्षिक साठवणुकीचे धान्य घेण्यासाठी ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे डाळींना मागणी वाढली असून, डाळींच्या भावात वाढ झाली आहे. सध्या डाळींना मागणी वाढल्याने दरात वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी स्पष्ट केले.
भाजीपाला आणि इंधनानं गृहीणीचे किचनचं बजेट बिघडलेलं असताना आता यात डाळींची भर पडलीये. जुलै महिन्यात देशातील बहुतांश शहरात डाळी महाग झाल्यात. तूर डाळीच्या किंमती 4 ते 12 टक्क्यांपर्यंत वाढल्यात तर उडीद डाळीच्या किंमतीही तीन ते तेरा टक्क्यांनी वाढल्या आहेत. देशात डाळींचं रेकॉर्डब्रेक उत्पादन आणि डाळींची आयात नगण्य असतानाही डाळी महाग होतायेत. 2021-22 दरम्यान देशात 277 लाख 5 हजार टन डाळींचं उत्पादन झालंय. हे उत्पादन आतापर्यंतचं सर्वाधिक उत्पादन आहे. 2020-21 च्या तुलनेत जवळपास 23 लाख टनांहून अधिक डाळींचं उत्पादन जास्त झाले आहे.
गेल्या काही वर्षांपासून भारतातून डाळींची निर्यात सतत वाढत आहे आणि या वाढलेल्या निर्यातीमुळेच देशांतर्गत पुरवठा मर्यादित राहतोय. 2021-22 या आर्थिक वर्षात भारतातून उच्चांकी चार लाख एक हजार टन डाळींची निर्यात झालीये आणि यंदा डाळींच्या निर्यातीचा वेग गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे.यावर्षी एप्रिल आणि मे दरम्यान सुमारे एक लाख 90 हजार टन डाळींची निर्यात झाली. गेल्यावर्षीच्या याच काळातील निर्यातीपेक्षा ही निर्यात जवळपास पाचपट अधिक आहे. गेल्या वर्षी एप्रिल आणि मे दरम्यान फक्त 36 हजार 829 टन डाळींची निर्यात झाली होती.
Inflation Pulses Rates Increased Grocery