इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तुमच्या घरात भंगार असेल तर तो टाकावू कचरा आहे असे अजिबात समजू नका. घरात पडून असलेल्या या भंगाराची किंमत आजच्या महागाईच्या जमान्यात वाढली आहे. लोखंड, प्लॅस्टिक, रद्दी, पुठ्ठे या सर्व टाकावू वस्तूंची किंमत चार ते पाच रुपये प्रति किलो वाढले आहेत. लोखंडाचे भंगार सर्वात महाग म्हणजेच ४२ रुपये प्रति किलो किमतीत विक्री होत आहे.
घरांमध्ये वापरली जाणारी उपकरणे तुटल्यानंतर ते भंगारात ठेवले जातात. बहुतांश घरांमध्ये स्टोअर रूममध्ये भंगार ठेवले जाते. भंगारवाले दारावर आल्यानंतर त्यांना ते विक्री केले जाते. याच भंगाराला आता सोन्याची किंमत आली आहे. प्रत्येक वस्तूच्या किमती वाढत असताना आता भंगारच्या किमतीही मागे राहिल्या नाहीत. भंगाराच्या किमतींनी उसळी घेतली आहे. लोखंडाच्या वस्तू सर्वात महागडे भंगार ठरत आहे. वृत्तपत्रांच्या रद्दीलाही सोन्याचे दिवस आले आहेत.
भंगाराच्या किमतीत वाढ झाल्यानंतर शहरांमध्ये भंगार गोळा करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पूर्वी भंगाराच्या दुकानात भंगार घेऊन जात होतो, तेव्ही कमी पैसे मिळत होते. परंतु सध्या चांगले दर मिळत आहेत. रद्दी २० रुपये प्रतिकिलो रुपये विक्री होते, तर लोखंड ४२ रुपये प्रतिकिलो रुपयांनी विक्री होते, अशी माहिती भंगार गोळा करणाऱ्या एका व्यक्तीने दिली.
भंगाराच दर वाढण्यासह लग्न-समारंभात किंवा पार्टीमध्ये पॅक करण्यासाठी मिळणाऱ्या डब्यांचा दरही वाढला आहे. वापर झाल्यानंतर पुठ्ठ्यांचा दर १८ रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्याचवेळी कारखान्यांमधून येणाऱ्या पुठ्ठे शंभर रुपयांहून अधिक महाग असल्याचे पुठ्ठ्यांपासून डिझायनर बॉक्स बनवणाऱ्या कारागिरांचे म्हणणे आहे. त्यात वाहतुकीचा खर्चही वाढला आहे.
भंगाराचे दर
लोखंड – पूर्वी ३० रुपये, आता ४२ ते ५० रुपये किलो
पुठ्ठा – पूर्वी १२ रुपये, आता १८ ते २४ रुपये किलो
प्लॅस्टिक – पूर्वी १८ रुपये, आता २५ ते ३० रुपये किलो
काच – पूर्वी दोन रुपये, आता ५ ते ८ रुपये किलो
पत्रे – पूर्वी १५ रुपये, आता २० ते २५ रुपये किलो
रद्दी – पूर्वी १२-१५ रुपये, आता ३० ते ३५ रुपये किलो