विशेष प्रतिनिधी, मुंबई
आजच्या काळात अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुविधा असलेले अनेक मोबाईल फोन विक्रीसाठी येत आहेत आहेत. अत्यंत आकर्षक आणि विविध गॅझेट असलेल्या या फोनची तरुणांमध्ये मोठी क्रेझ असते. अशाच प्रकारे अनेक सोयीसुविधा असलेला एका अत्याधुनिक फोन आज (रविवार १३ जून) बाजारात दाखल होत आहे. प्रसिद्ध मोबाईल फोन निर्माता कंपनी इन्फिनिक्स यांनी आपला नवीन आणि ग्राहकांना परवडणारा स्मार्टफोन Infinix Note10 या लाँच केला आहे. हा फोन प्रथमच विक्री होत आहे. या फोनची किंमत ११ हजार रुपयांपेक्षा कमी आहे. या फोनमध्ये फुल एचडी डिस्प्ले, ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि एमएएच बॅटरी अशी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. फोनच्या संबंधित अधिक माहिती जाणून घेऊ या…
किंमत
इन्फिनिक्स टीप 10 स्मार्टफोन दुपारी 12 वाजता ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टद्वारे खरेदी करता येईल. फोन दोन किंमती मध्ये उपलब्ध असून त्याच्या 4 जीबी रॅम प्लस 64 जीबीच्या फोनची किंमत 10,999 रुपये आहे आणि 6 जीबी रॅम प्लस 128 जीबीच्या फोनची किंमत 11,999 रुपये आहे. हा फोन जांभळा, काळा आणि हिरवा अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.










