शुक्रवार, ऑक्टोबर 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इन्फिनिक्सने लॉन्च केला ६.६ इंच एचडी स्क्रीनचा हा स्मार्टफोन; किंमत अवघी ६७९९ रूपये

ऑगस्ट 17, 2022 | 5:00 am
in राष्ट्रीय
0
Smart 6 HD Image

 

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ट्रांसियॉन ग्रुपचा प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्ड इन्फिनिक्सने त्यांच्या मूल्य-संचालित स्मार्ट सिरीजमधील उदयोन्मुख नवीन स्मार्टफोन स्मार्ट ६ एचडी लॉन्च केला आहे. हा डिवाईस युजर्सना सर्वसमावेशक स्मार्टफोन अनुभव देण्यासाठी बिग स्क्रिन व बिग बॅटरी, तसेच बिग स्टोरेज अशा आवश्यक गोष्टींबाबत तडजोड करत नाही. फक्त फ्लिपकार्टवर ६७९९ रूपये या स्पेशल लॉन्च किंमतीमध्ये उपलब्ध असणा-या स्मार्ट ६ एचडीमध्ये फेस अनलॉक वैशिष्ट्य आणि इतर विविध कॅटेगरी-फर्स्ट अत्याधुनिक वैशिष्ट्ये आहेत. या डिवाईस अॅक्वा स्काय, ओरिजिन ब्ल्यू व फोर्स ब्लॅक या तीन आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये येतो.

सर्वात मोठी स्क्रिन व डिस्प्ले:
सर्वात मोठे व प्रखर मोबाइल व्युईंग अनुभवाच्या खात्रीसाठी नवीन स्मार्ट ६ एचडी मध्ये ६.६ इंच ड्रॉप नॉच स्क्रिनसह ५०० नीट्सचे ब्राइटनेस आहे. ९०.६ टक्के स्क्रिन-टू-बॉडी रेशिओ असलेल्या या डिवाईसच्या सिनेमॅटिक स्क्रिनमध्ये १५००:१ कॉन्ट्रास्ट रेशिओ आणि ९९ टक्के सुपर आरजीबी कलर गम्यूट आहे, ज्यामुळे फोटोज व व्हिडिओज सूर्यप्रकाशात देखील सुस्पष्ट व आकर्षक दिसतात. आकर्षक व्युईंग अनुभवाला डीटीएस सराऊंड साऊंड स्पीकरच्या शक्तिशाली साऊंड अनुभवाची जोड आहे, ज्यामधून इंद्रियांना आनंददायी संगीत ऐकण्याचा आनंद मिळतो.

विशाल क्षमतेची बॅटरी:
स्मार्ट ६ एचडीमध्ये ५००० एमएएच बॅटरी पॉवरहाऊस आहे, ज्याला पॉवर मॅरेथॉन वैशिष्ट्याचे पाठबळ आहे, जे जवळपास १०२ तासांचे संगीत ऐकण्याचा, १३५ तासांचे कॉलिंग आणि २६ तासांचे मनसोक्तपणे व्हिडिओज पाहण्याचा आनंद देते. हे तंत्रज्ञान तीन पॉवर-सेव्हिंग धोरणे देतात: ‘पॉवर बूस्‍ट’, ‘अल्ट्रा पॉवर मोड’ आणि ‘व्हिडिओ पॉवर इंजिन’. बॅटरी तिच्या एकूण क्षमतेच्या ५ टक्क्यांपर्यंत असताना युजर्स पॉवर मॅरेथॉन टेकच्या माध्यमातून अल्ट्रा पॉवर मोड चालू करू शकतात आणि अतिरिक्त १५ तासांपर्यंत बॅटरी कार्यरत ठेवू शकतात, ज्यामधून जवळपास ९० मिनिटांचा कॉलिंग टाइम मिळू शकतो.

आकर्षक लुक्स:
निसर्गाच्या सर्वोत्तम बाबींमधून प्रेरित स्मार्ट ६ एचडीमध्ये चमकदार ऑरो वेव्ह्ज डिझाइन आहे, जी प्रत्येक क्षणी चमकते. उल्लेखनीय, पण स्टायलिश असलेल्या या डिवाईसमध्ये चार उत्साही फिनिशेस आहेत, ज्यामुळे तुम्ही गर्दीमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घ्याल.
सुधारित सुरक्षितता:
स्मार्ट ६ एचडी समजण्यास व वापरण्यास सुलभ असलेल्या वैशिष्ट्यांसह अधिक गोपनीयतेची खात्री देतो. या डिवाईसमध्ये फोन व स्टोअर केलेल्या डेटाच्या सुधारित सुरक्षिततेसाठी फेस अनलॉक देखील आहे.

व्यापक स्टोरेज क्षमता:
नवीन स्मार्ट ६ एचडीमध्ये ३२ जीबी स्टोरेज आहे, ज्याला इन-बिल्ट २ जीबी एलपीडीडीआर४एक्स जीबी रॅम आणि वाढवता येऊ शकणा-या अतिरिक्त २ जीबी व्हर्च्युअल रॅमचे पाठबळ आहे. व्हर्च्युअल रॅम वैशिष्ट्य कार्यान्वित करत टेम्पररी फाइल्स डिवाईसमधील इंटर्नल स्टोरेजमध्ये पाठवता येतो आणि स्मार्टफोन सर्वाधिक वापरले जाणारे अॅप्स पार्श्वभूमीमध्ये कार्यरत ठेवू शकतो. युजर्सना ते अॅप्स लॉन्च होण्याची अधिक वाट पाहावी लागणार नाही आणि अॅप्सदरम्यान जलदपणे मल्टीटास्क करू शकतात.

कॅमेरा कार्यक्षमता:
स्मार्ट ६ एचडी ८ मेगापिक्सल एआय रिअर कॅमेरा व ड्युअल एलईडी फ्लॅशलाइटच्या माध्यमातून संस्मरणीय क्षणांना कॅप्चर करतो, ज्यामधून सर्वोत्तम व अधिक अचूक सुस्पष्टता व सर्वोत्तम बोकेह इफेक्टची खात्री मिळते. या स्मार्टफोनमध्ये ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरासह ड्युअल एलईडी फ्लॅश देखील आहे. सेल्फी कॅमेरामध्ये देखील आवश्यक मोड्स आहेत, जसे टाइम-लॅप्से, पोर्ट्रेट मोड, वाइड सेल्फी मोड आणि फुल एचडी व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याची क्षमता आहे.

Infinix LED Screen Smartphone Price Features
Technology Mobile

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दिंडोरी तालुक्यातील भूकंपाचे सौम्य धक्के; ३.४ रिश्टर स्केलची नोंद

Next Post

झोळीतून महिलेला प्रसुतीसाठी नेले… जुळ्या मुलांचा जन्म झाला, पण….

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

CM
मुख्य बातमी

विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्यमंत्र्यांनी अशा दिल्या शुभेच्छा….

ऑक्टोबर 2, 2025
jalaj sharama
स्थानिक बातम्या

अनुकंपासह एमपीएससीच्या शिफारसपात्र ४८५ उमेदवारांना मिळाली नोकरीची संधी

ऑक्टोबर 2, 2025
rain1
महत्त्वाच्या बातम्या

८ ऑक्टोबर पासून राज्यातून मान्सून निरोप घेणार…

ऑक्टोबर 2, 2025
प्रातिनिधीक संग्रहित फोटो
इतर

नगरपरिषद, नगरपंचायती प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबरला प्रसिद्ध होणार

ऑक्टोबर 2, 2025
Untitled
संमिश्र वार्ता

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

ऑक्टोबर 2, 2025
st bus
महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील पूरपरिस्थितीमुळे १० टक्के एसटी भाडेवाढीचा निर्णय रद्द…

ऑक्टोबर 2, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या कार्यास गती येईल, जाणून घ्या, गुरुवार, २ ऑक्टोंबरचे राशिभविष्य

ऑक्टोबर 2, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
संमिश्र वार्ता

कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक धोरण….राज्यभरातील या १८ रुग्णालयांमध्ये मिळणार दर्जेदार उपचार

ऑक्टोबर 1, 2025
Next Post
प्रातिनिधीक संग्रहित फोटो

झोळीतून महिलेला प्रसुतीसाठी नेले... जुळ्या मुलांचा जन्म झाला, पण....

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011