मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इन्फिनिक्स या ट्रांसियॉन ग्रुपच्या प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने आज इनबुक एक्स१ श्रेणीमध्ये नवीन इनबुक एक्स१ स्लिम हा विभागातील सर्वात सडपातळ आणि वजनाने सर्वात हलका लॅपटॉप लॉन्च केला. या लॅपटॉपची किंमत ३० हजार रूपयांपेक्षा कमी असून जो अधिक पोर्टेबिलिटीची खात्री देतो. वजन फक्त १.२४ किग्रॅसह १४.८ मिमी जाडी असलेल्या या टेन्थ जरनेशन इंटेल कोअर डिवाईसमध्ये अनेक फर्स्ट-इन-सेगमेंट वैशिष्ट्ये आहेत आणि हा आय३ (८ जीबी + २५६ जीबी, ८ जीबी + ५१२ जीबी), आय५ (८ जीबी + ५१२ जीबी, १६ जीबी +५१२ जीबी) आणि टॉप स्पीड आय७ (१६ जीबी + ५१२ जीबी) तीन प्रोसेसर व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध असेल. हा लॅपटॉप प्रत्येक स्टाइलला साजेसे अशा स्टारफॉल ग्रे, कॉस्मिक ब्ल्यू, नोबल रेड, अरोरा ग्रीन चार ट्रेण्डी व आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे.
इन्फिनिक्स इंडियाचे सीईओ श्री. आशिष कपूर म्हणाले, “नवीन इनबुक एक्स१ स्लिमसह आमचा जनरेशन झेड व मिलेनियल ग्राहकांच्या सर्वसमावेशक जीवनशैली व डिझाइन आवडींशी संलग्न होणारे उत्पादन निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, कारण ते सततकाम, शिक्षण व गेमिंगसाठी एक-थांबा सोल्यूशनचा शोध घेत असतात. विद्यार्थी व श्रमजीवी व्यावसायिक नेहमीच कार्यरत असल्याची बाब लक्षात घेत आम्ही डिवाईसला अत्यंत सडपातळ व वजनाने हलके बनवले आहे, ज्यामुळे हा डिवाईस सुलभपणे वाहून नेण्यास अत्यंत पोर्टेबल आहे. पहिल्यांदाच आम्ही इंटेल कोअर आय५ ची शक्ती असलेला १६ जीबी स्टोरेज व्हेरिएण्ट सादर करणार आहोत. क्रिएटिव्ह व्यावसाययिक आणि नेहमी गतीशील असलेल्या ग्राहकांसाठी डिझाइन करण्यात आलेला इनबुक एक्स१
स्लिम टिकाऊ, उच्च-कार्यक्षम व विश्वसनीय लॅपटॉप आहे. या लॅपटॉपमध्ये कार्यक्षम बॅटरी बॅकअप, तसेच मल्टी-पर्पज चार्जर आहे, ज्यामुळे दैनंदिन वापरासाठी हा अत्यंत अनुकूल डिवाईस आहे. तसेच या डिवाईसमध्ये ५१२ जीबी एसएसडी स्टोरेज, ८ जीबी रॅम, ड्युअल-स्टार कॅमेरा आणि बॅकलिट कीबोर्ड आहे. हा डिवाईस विंडोज ११ वर संचालित आहे, जे जवळपास ३० सेकंदांमध्ये बूट अप होते.”
अल्ट्रा-थिन व अल्ट्रा-लाइट डिझाइनसह उच्च दर्जाचा व्युइंग अनुभव: नवीन इन्फिनिक्स इनबुक एक्स१ स्लिम लॅपटॉप हा बाजारपेठेत सध्या उपलब्ध असलेल्या या किंमतीमधील सर्वात सडपातळ व वजनाने सर्वात हलका लॅपटॉप आहे. अॅल्युमिनिअम अलॉय-आधारित मेटल बॉडी असताना देखील या लॅपटॉपचे वजन फक्त १.२४ किग्रॅ आणि जाडी १४.८ मिमी आहे. हा डिवाईस अत्यंत पोर्टेबल व शक्तिशाली आहे, ज्यामधून युजर्सना एका ठिकाणांहून दुस-या ठिकाणी सुलभपणे जाता येते.
या लॅपटॉपमध्ये १४ इंच फुल एचडी+ आयपीएस डिस्प्लेसह ३०० नीट्स सर्वोच्च ब्राइटनेस आणि १०० टक्के सुपर आरजीबी कलर रिप्रॉडक्शन आहे. यामुळे हा घरी व कार्यालयामध्ये वापरासाठी अत्यंत अनुकूल डिवाईस आहे. तसेच युजर्स मुलभूत गेम्स आणि नेटफ्लिक्स व अॅमेझॉन प्राइमवर व्हिडिओ स्ट्रिमिंगचा आनंद घेऊ शकतात. इन्फिनिक्स इनबुक एक्स१ स्लिमचा एचडी वेबकॅम आणि द्वि-स्तरीय स्टिरिओ स्पीकर्ससोबत प्रगत डीटीएस साऊंड तंत्रज्ञानासह तुम्ही उत्तम साऊंड क्वॉलिटीमध्ये व्हिडिओज पाहू शकता व गेम्स खेळू शकता. तसेच या लॅपटॉपमध्ये ड्युअल-स्टार लाइट कॅमेरा वैशिष्ट्य देखील आहे, जे अंधुक प्रकाशात व्हिडिओ कॉल्स करताना किंवा झूम मीटिंग्जना उपस्थित असताना व्हिजिबिलिटी वाढवते.
सर्वोत्तम बॅटरी बॅकअप: उच्च क्षमतेची ५० डब्ल्यूएच बॅटरीची शक्ती असलेला इन्फिनिक्स इनबुक एक्स१ स्लिम काम करताना दीर्घकाळापर्यंत लॅपटॉपशी संलग्न असलेल्या तरूणांसाठी उपयुक्त आहे. हा लॅपटॉप ११ तासांचे वेब ब्राउजिंग, ९ तासांचे नियमित काम आणि ९ तासांचे व्हिडिओ प्लेबॅक विनाव्यत्यय देतो. यामधून शक्ती व पोर्टेबिलिटीच्या परिपूर्ण संतुलनाची खात्री मिळते. हाय-पॉवर टाइप-सी मल्टी-युटिलिटी चार्जर युजर्सना डेटा शेअर करण्याची, त्यांचे स्मार्टफोन्स चार्ज करण्याची आणि त्यांचे लॅपटॉप्स चार्ज करण्यासोबत एकाचवेळी बॅटरीला सपोर्ट देतो. ६५ वॅट ईजी-टू-कॅरी टाइप-सी चार्जर ९० मिनिटांमध्ये लॅपटॉपला १०० टक्के चार्ज करू शकतो.
जलद कार्यक्षमता व व्यापक स्टोरेज: टॉप स्पीड कार्यक्षमता देण्यासाठी टेन्थ जनरेशन इंटेल कोअर प्रोसेसर असलेले आय३, आय५ व आय७ व्हेरिएण्ट्स विंडोज ११ होमशी सुसंगत आहे. हा प्रोसेसर इनबुक एक्स१ स्लिम लॅपटॉप्सना शक्ती देतो. या लॅपटॉपमध्ये १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी एम.२ एनव्हीएमई पीसीआयई ३.० एसएसडी आहे, ज्यामधून सामान्य एसएटीए एसएडींच्या तुलनेत पाच पट जलद गती मिळते. यामुळे युजर्सना २४०० एमबींची वाचन गती आणि १९०० एमबींची लेखन गती मिळते. ८ जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅमची ड्युअल-चॅनेल मेमरी युजर्सना एकाच वेळी हेवी प्रेझेन्टेशन्स तयार करणे, ग्राफिक, डिझाइनिंग व प्रोग्रामिंग असे आव्हानात्मक टास्क्स करण्याची सुविधा देते.
इन्फिनिक्स इनबुक एक्स१ स्लिममध्ये इतर सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत, जसे आइस स्टॉर्म १.० कूलिंग सिस्टिम, जी दीर्घकाळापर्यंत गेमिंग, कामकाज व कन्टेन्ट पाहण्याचा आनंद घेत असताना देखील तापमान कमी ठेवते. तिन्ही व्हेरिएण्ट्समध्ये अनेक कनेक्टीव्हीटी पोर्टससह दोन यूएसबी ३.० पोट्स, २ यूएसबी टाइप-सी पोर्ट, चार्जिंग व डेटा ट्रान्सफरसाठी एक व फक्त डेटा ट्रान्सफरसाठी एक आणि सर्व फंक्शनसाठी एक, एचडीएमआय १.४ पोर्ट, एसडी कार्ड रीडर आणि ३.५ मिमी हेडसेट व मायक्रोफोन कॉम्बो जॅक आहे. तसेच या व्हेरिएण्ट्समध्ये जलद डाऊनलोड्ससाठी वाय-फाय ५ देखील इन्स्टॉल केलेले आहे.