पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – इनफिनिक्स कंपनीने भारतात पहिला 5G स्मार्टफोन इनफिनिक्स Zero 5G लॉन्च केला आहे. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 5 जीबी व्हर्च्युअल रॅम सपोर्ट देण्यात आला आहे. इनफिनिक्स Zero 5G स्मार्टफोन एकूण 13 GB रॅम सपोर्टसह येईल. तसेच फोनमध्ये 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. इनफिनिक्स Zero 5G स्मार्टफोन 19,999 रुपयांमध्ये देण्यात येणार आहे. फोनची विक्री फ्लिपकार्टवर होणार आहे. हा फोन कॉस्मिक ब्लॅक स्काय लाइट ऑरेंज या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये येतो.
इनफिनिक्स Zero 5G स्मार्टफोन Flipkart स्मार्ट अपग्रेड प्लॅनमध्ये केवळ 70 टक्के किंमत देऊन केवळ 13,999 रुपयांमध्ये खरेदी केला जाऊ शकतो. तसेच हे 30 टक्के म्हणजेच 6000 रुपये एक वर्षानंतर द्यावे लागतील. अन्यथा, ग्राहक फोन परत करून नवीन Infinix Zero 5G स्मार्टफोन खरेदी करू शकतील. इनफिनिक्स Zero 5G स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा FHD + LTPS डिस्प्ले सपोर्ट आहे. फोनमध्ये 500 nits चा पीक ब्राइटनेस देण्यात आला आहे. तसेच, फोन 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. याशिवाय 240Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये नवीनतम 6nm आधारित ऑक्टाकोर डायमेन्सिटी 900 देण्यात आला आहे. हा फोन Android 11 आधारित XOS 10.0 वर काम करेल.
इनफिनिक्स Zero 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मुख्य कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा आहे. तसेच 13MP पोर्ट्रेट लेन्स आणि 2MP बोकेह इमेज देण्यात आली आहे. फोनमध्ये 30X झूम देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP AI कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच तो ड्युअल फ्लॅश लाईट सपोर्ट सह देण्यात येतो. पॉवर बॅकअपसाठी, एक मोठी 5000mAh बॅटरी प्रदान करण्यात आली आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक आहे. इनफिनिक्स Zero हा 5G फोन आहे. पण त्यात सर्वाधिक 13 5G बँड आहेत.