अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
नाशिक जिल्हयात मोठ्या प्रमाणावर शेतकरी मका पिकाची लागवड करीत असतात. अनेक शेतक-यांनी पहिल्या पावसानंतर मक्याची लागवड केली. त्यानंतर पिक मोठी होत असतांनाच मक्यावर यंदा पुन्हा लष्करी अळीचा प्रार्दुभाव दिसून येऊ लागला आहे. पानांवर आणि पोग्या मध्ये अळी पाने कुतरडत असल्याने पिकांची वाढ खूंटते त्यामुळे महागडे औषधांची फवारणी करण्याची वेळ शेतक-यांवर आली आहे. आधिच खत व औषधे महागलेली असतांना आता पुन्हा नविन खर्च करण्याची वेळ आली आहे. शिवाय एवढ करुन ही पिक नष्ट झालीच तर दुबार पेरणीच संकट शेतक-यां समोर असल्याने शेतकरी चिंता ग्रस्त झाला आहे.