लंडन – कोरोनाचा संसर्ग केवळ आपल्या देशात नसून जगभरात आहे. त्याचे प्रमाण कमी जास्त होत असताना याबाबत संशोधन देखील सुरू आहे. आतापर्यंत गेल्या १० महिन्यांपासून ज्या – ज्या व्यक्तींना कोरोना झाला आहे, त्या -त्या व्यक्तींना पुन्हा कोरोना होणार नाही, असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.
जगभरातील लोकांना कोरोनाने ग्रासले असून त्यामुळे सर्वजण घाबरू गेल आहेत. त्यातच एकापाठोपाठ नवीन विषाणू येत आहेत. मात्र आता नवीन संशोधनात असे दिसून आले आहे की, गेल्या १० महिन्यांपासून ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्या लोकांमध्ये पुन्हा संसर्ग होण्याचा धोका कमी आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील शास्त्रज्ञांनी केअर होम रहिवासी आणि कर्मचार्यांवर केलेल्या संशोधन अभ्यासात हे उघड झाले आहे.
या अभ्यासानुसार असे म्हटले आहे की, पूर्वी कोरोना संसर्ग झालेल्या होम कॉरन्टाईन रहिवाशांना गेल्या ऑक्टोबर ते फेब्रुवारी महिन्यात पुन्हा संसर्ग होण्याचा धोका होता. यूसीएल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ इनफॉरमॅटिक्सच्या अभ्यास आघाडीच्या संशोधक मारिया कृतिकोव्ह म्हणाल्या, या कालावधीत नैसर्गिक वातावरणामुळे पुन्हा संसर्ग रोखला जातो. तसेच दोनदा संसर्ग होण्याचा धोका खूप कमी असल्याचे दिसून येते. या संशोधनात ६८२ केअर होम रहिवाश्यांचा समावेश करण्यात आला आहे, त्यातील बहुतेक लोकांचे वय ६५ते ८६ वर्षे आहे. याशिवाय यात १, ४२९ केअर होम कामगारांचा समावेश होता.