इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – तीन टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 168 धावांनी पराभव केला. टीम इंडियाचा टी-20 इतिहासातील हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी 2018 मध्ये त्याने आयर्लंडचा 148 धावांनी पराभव केला होता. दुसरीकडे, न्यूझीलंडचा हा T20 इतिहासातील सर्वात मोठा पराभव आहे. यापूर्वी 2010 मध्ये पाकिस्तानने त्याचा 103 धावांनी पराभव केला होता.
मालिकेतील पहिला सामना रांचीमध्ये खेळला गेला. त्यानंतर न्यूझीलंड जिंकला. त्यानंतर सलग दोन सामने जिंकून मालिका जिंकण्याचे आव्हान भारतासमोर होते. हार्दिक पांड्याच्या संघाने शानदार पुनरागमन करत लखनौपाठोपाठ अहमदाबादमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारताने सलग चौथी टी-20 मालिका जिंकली. मागील वर्षी हार्दिकने आयर्लंड आणि न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्याचबरोबर यंदा श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडविरुद्धची मालिकाही जिंकली आहे.
https://twitter.com/BCCI/status/1620827684225056768?s=20&t=5HXZYr0z7JrwH2nJr8DY_g
भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 षटकात 4 विकेट गमावत 234 धावा केल्या. शुभमन गिलने 63 चेंडूत नाबाद 126 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 12.1 षटकांत 66 धावांवर गारद झाला. न्यूझीलंडसाठी केवळ दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. डॅरेल मिशेलने 35 आणि कर्णधार मिचेल सँटनरने 13 धावा केल्या. भारताकडून कर्णधार हार्दिक पंड्याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
https://twitter.com/BCCI/status/1620826978386612224?s=20&t=5HXZYr0z7JrwH2nJr8DY_g
INDvsNZ 3rd T20 India Win Match and Series