इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतात कोण, कधी आणि काय जुगाड करील याचा काही नेम नाही. असं म्हणतात की भारत ही बुद्धीवंतांची खाण आहे. एका दूधवाल्याने जबरदस्त देशी जुगाड करीत थेट एफ१ सारखी कार तयार केली. विशेष म्हणजे ही कार रेससाठी नाही तर आहे दूध वाटण्यासाठी. या दूधवाल्याचा एक व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. आणि त्याची दखल ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी घेतली आहे. ही एफ१ कार महिंद्रा यांनी एवढी आवडली की त्यांनी थेट या दूधवाल्याला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. कशी आहे या दूधवाल्याची ही भन्नाट कार तुम्हीच बघा
https://twitter.com/RoadsOfMumbai/status/1519522182132469760?s=20&t=jKxrWazyRBCS_pfacott-A