मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उद्योजक आनंद महिंद्रा हे त्यांच्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी ग्रामीण भारतात असलेले टॅलेंट आपल्या ट्विटच्या माध्यमातून जगासमोर आणतात तर कधी त्यांना देशातील कानाकोपऱ्यातील गंभीर समस्या सर्वांसमोर आणतात. महिंद्रा ग्रुपचे चेअरमन असलेले आनंद महिंद्रा हे संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणूनही ओळखले जातात. आता त्यांनी एक व्हिडिओ शेअर करीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनाच थेट सवाल केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून Cosmic Gaia या ट्विटर हँडलवरून केलेला व्हिडीओ शेअर करत त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे की, नितीन गडकरी हे रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधकाम विभागाचे मंत्री असल्याने आणि त्यांनी देशात राबवत असलेल्या रस्ते योजनांमुळे आनंद महिंद्रा यांनी त्या व्हिडीओतील रस्त्याप्रमाणे गर्दा झाडीतील बोगद्याप्रमाणे मला निश्चित बोगदे आवडतात असं ते आपल्या ट्विटमध्ये म्हणतात.
नितीन गडकरी यांना त्यावरुन सवाल करत म्हणतात की, ग्रामीण भागात तुम्ही बांधत असलेल्या रस्त्यांवर असे काही नियोजन करु शकता का असा सवाल त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना केला आहे. उद्योजक आनंद महिंद्रा यांनी गर्द झाडीतील त्या रस्त्याचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर आणि नितीन गडकरी यांना सवाल केल्याबद्दल त्यांना अनेक जणांनी रिट्विटही केले आहे. तर अनेक जणांनी त्यांच्या या गोष्टीचे समर्थन केले आहे.
https://twitter.com/anandmahindra/status/1563460469846724609?s=20&t=fDMxwqeEDOtXMI5Bi3K1nA
महत्त्वाचे आनंद महिंद्रांचे अनेक व्हिडीओ हे विकासाच्या मुद्यावर नेहमीच बोलत असतात, कधी त्यांच्या ट्विट मधून सवाल असतो तर कधी कोणत्या तरी गोष्टीवर उत्तरही असतं त्यामुळे देशात होत असलेल्या रस्ता बांधकामाचे कामाबद्दल अनेक वेळा पर्यावरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित झालेले असताना आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ म्हणजे रस्त्यांसाठी होत असलेली वृक्ष तोडीवर सवाल उपस्थित केला आहे.
सध्या अनेक नवनव्या महामार्गांसाठी होत असलेल्या वृक्षतोडीमुळे काम थांबणं, मार्ग बदलणे, वन विभागाचा प्रश्न उपस्थित होणे अशा समस्या निर्माण होत असतानाच आनंद महिंद्रांनी रस्ते वाहतूक आणि महामार्ग बांधकाम विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांना गर्द झाडीतील आणि झाडांच्या बोगद्यातून प्रवास करायला मला आवडेल असंही ते सांगतात. देशभरातील विविध रस्त्यांवर दुतर्फा डेरेदार वृक्ष असतील तर प्रवास निश्चितच सुखाचा होईल यात शंका नाही असे म्हटले जाते.
Industrialist Anand Mahindra Ask Question to Union Minister Nitin Gadkari
Social Media Twitter Video