मंगळवार, डिसेंबर 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

कोकणात बारसूमध्ये नक्की काय होतंय? खरं काय आहे? कोण राजकारण करतंय? उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं…

एप्रिल 25, 2023 | 4:37 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
uday samant 1140x570 1 e1702049597985

 

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कोकणातील बारसू येथे रिफायनीच्या सर्वेक्षणावरुन वातावरण तापलं आहे. स्थानिक ग्रामस्थांनी यास कडाडून विरोध केला आहे. शेकडोच्या संख्येने परुष व महिला ग्रामस्थ घटनास्थळावर दाखल आहेत. सर्वेक्षणाला त्यांचा विरोध आहे. यावरुन सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. खासकरुन ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आता यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक बाबींच उलगडा केला आहे. ते आज नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

मंत्री उदय सामंत म्हणाले की, रिफायनरीच्या कामात राजकारण केले जात आहे. थेट जालियनवाला बागशी तुलना केली जात आहेत. मात्र, वस्तुस्थिती काय आहे पहायला हवे. प्रत्यक्षात बारसू येथे रिफायनरीचा प्रकल्प व्हावा यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजेच उद्धव ठाकरे यांनी १२ जानेवारी २०२२ ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.  बारसु मध्ये १३०० एकर जमीन रिफायनरीसाठी देऊ शकतो असे पत्र लिहिले होते. आणि आता तेच सरकारवर आरोप करीत आहेत. हे राजकारणच असल्याचा टोला सामंत यांनी लावला.

मंत्री सामंत पुढे म्हणाले की, समृध्दी महामार्गाच्या भूसंपादना बाबतीतही तेच होत होते. केवळ राजकारण केले गेले. अखेर आम्ही हा महामार्ग तडीस नेला. राज्याला त्याचा फायदा होतोय. उद्धव ठाकरेंच्या पत्रामुळेच आज बारसुमध्ये सर्वेक्षण सुरू आहे. सेना भवनवर एक पत्रकार परिषद झाली होती. त्यात रिफायनरी आम्ही आणली त्याचे श्रेय सरकारने घेऊ नये असे म्हटले होते. आता यात राजकारण का, असा प्रश्नही सामंत यांनी विचारला.

मंत्री सामंत म्हणाले की, आता विरोध का होतोय याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे. दुटप्पी राजकारण बंद झाले पाहिजे. विकासासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. उद्योग बाहेर गेले म्हणून सांगणारे आता उद्योग येत असताना विरोध का करतात, याचे उत्तर दिले पाहिजे. पत्र लिहण्यावर आक्षेप नाही, पण हे तर पत्रकार परिषद घेऊन कायदा सुव्यवस्था बिघडवण्यासाठी सारे काही करताय, असा आरोप सामंत यांनी केला.

बारसूच्या सर्वेक्षणाबाबत शरद पवार यांच्याशी फोनवर चर्चा झाल्याचे सामंत यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांंशी चर्चा करु त्यानंतर आपल्याला कळविले जाईल, असे सामंत यांनी सांगितले. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून फडणवीस यांनी नाणार प्रकल्प रद्द केला याचे उत्तर ठाकरे यांनी दिले पाहिजे, असे सामंत म्हणाले. बारसूमध्ये सध्या माती परीक्षण केले जात आहे. प्रकल्प करण्यासाठी जागा योग्य आहे की नाही हे बघण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे. त्यानंतर प्रकल्प करायचा की नाही हे ठरवू, असे सामंत यांनी स्पष्ट केले.

Industry Minister Uday Samant on Kokan Barsu Refinery Project

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यपाल रमेश बैस दोन दिवसांच्या अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर

Next Post

शालेय शिक्षणात लवकरच शिकविला जाणार हा विषय; शिक्षण विभागाला अहवाल सादर

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शुक्रवारचा दिवस… जाणून घ्या, १४ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 13, 2025
Vishwadharmi Manavta Teertha Rameshwar Rui
महत्त्वाच्या बातम्या

उध्वस्त मंदिर व मशिदीच्या जागी ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन’… उद्या होणार लोकार्पण… अशी आहेत त्याची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
traffic signal1
महत्त्वाच्या बातम्या

अहिल्यानगर – मनमाड मार्गावरील वाहतुकीबाबत झाला हा महत्वाचा निर्णय…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0024
मुख्य बातमी

कुंभमेळ्यासाठी साडेपाच हजार कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमीपूजन…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0023
महत्त्वाच्या बातम्या

पंचवटीतील रामकाल पथचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमीपूजन… रामकुंडाचा चेहरामोहरा बदलणार…

नोव्हेंबर 13, 2025
IMG 20251113 WA0021
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण… अशी आहेत तिची वैशिष्ट्ये…

नोव्हेंबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा गुरुवारचा दिवस… जाणून घ्या, १३ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 12, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

या शहरात तीव्र थंडीची लाट… असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 12, 2025
Next Post
IMG 20230425 WA0006

शालेय शिक्षणात लवकरच शिकविला जाणार हा विषय; शिक्षण विभागाला अहवाल सादर

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011