इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे प्रमुख रतन टाटा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आताही तीच खास बाब आहे ती म्हणजे त्यांची साधी राहणी. त्यांचे जीवनमान आणि राहणी ही सर्वांसाठीच आदर्श आहे. कोट्यधीश आणि एवढी नावाजलेली व्यक्ती असतानाही त्यांना लवाजमा, बडेजाव बिल्कुल आवडत नाही. हे वारंवार निदर्शनास येते. आताही त्यांच्याबाबतीत तसेच दिसून येत आहे. हॉटेल ताजमध्ये काही कामानिमित्त ते आले होते. विशेष म्हणजे ते कुठल्याही आलिशान गाडीतून तेथे आले नाही तर सर्वात स्वस्त आणि सर्वसामान्यांसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा नॅनो कारमधून त्यांनी प्रवास केला. त्यांच्या सोबतीला ना सुरक्षा रक्षक होते की अन्य कुमी कर्मचारी. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असा प्रकारची त्यांची विचारधारा आहे. त्याचा अवलंब ते कसोशीने करीत असतात. नॅनो कारमधील त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात त्यांना सॅल्युट ठोकतो आहे. बघा, तुम्हीही हा व्हिडिओ
https://twitter.com/AnkitAce/status/1527096392983883776?s=20&t=xPHmUOOchRP4juBNiX-lww