इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा याचे पोर्नोग्राफी प्रकरण मध्यंतरी भलतेच चर्चेत होते. राज कुंद्रा हा कायम वादग्रस्त प्रकरणांमुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एका वेगळ्याच विषयात त्याने उडी घेतली आहे. आणि नेहमीप्रमाणे हा विषयही वादग्रस्त आहे. गेले काही दिवस अभिनेत्री शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. त्या दोघींच्या वादात मध्येच राज कुंद्रा घुसला आहे. शर्लिनने राज कुंद्रावर आरोप केले होते. त्यामुळे या वादात शर्लिन चोप्रावर राज कुंद्रा याने कमेंट केल्याने तो पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे.
काही दिवसांपासून सोशल मीडियावर शर्लिन चोप्रा आणि राखी सावंत यांच्यात शाब्दिक वॉर सुरु आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना राखी सावंत शर्लिनबाबत खूप काही बोलली होती. यावर पलटवार म्हणून शर्लिनने तिला टक्कल लपवणारी आणि भाड्याचे बॉयफ्रेंड मिरवणारी असं म्हटलं होतं. या दोघींच्या या वादात राज कुंद्राने उडी घेत शर्लिन चोप्रावर कमेंट करणारं ट्वीट केलं आहे.
तो लिहितो, “शर्लिन चोप्राबद्दल ट्वीट! या योग्यतेची ती नाहीच, पण कायदेशीर नोटीस पाठवून तिचा चुकीचा मुद्दा बरोबर आहे असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. तिने स्वत:चे अश्लील व्हिडीओ स्वतःच अपलोड केले आहेत आणि आता ती ते पायरेटेड आणि व्हायरल असल्याचं सांगत आहे. कोणीही सहजपणे हे गुगल करू शकतं.”, असंही राज याने या ट्विटमध्ये म्हटलं आहे. मात्र आपलं ट्विट आपल्याच अंगाशी येणार हे कळल्यावर राजने ते डिलीट केलं आहे. मात्र, तोपर्यंत त्याचे स्क्रीनशॉर्ट सगळीकडे व्हायरल झाले होते. त्यामुळे आता या ट्विटमुळे नवीन काय वाद निर्माण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
२०१२ मध्ये सुरू झालेल्या पोर्नोग्राफी केसचे धागे दोरे हे राज कुंद्रा पर्यंत येऊन थांबत आहेत. तर अश्लील चित्रपट बनवून अॅपद्वारे प्रदर्शित केल्याप्रकरणी क्राईम ब्रँचने २०२१ मध्ये मुंबईत राज कुंद्राविरुद्ध गुन्हा दाखल केला. मोठा उद्योजक होण्याअगोदर राज कुंद्राने देखील संघर्ष केला होता. मात्र नंतर चुकीचा मार्ग अवलंबल्याने आज कमावलेलं नाव घालवून बसल्याची वेळ राज कुंद्रावर आली आहे.
Industrialist Raj kundra Controversy Statement
Sherlyn Chopra