इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – जगात सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? याची सर्वसामान्य नागरिकांना नेहमीच उत्सुकता असते. जगभरात अनेक जण अति श्रीमंत असून त्यापैकी काही जण दानशूर देखील आहेत. या दानशूरांच्या यादीत आपल्या भारतीय श्रीमंत व्यक्तींचाही समावेश असतो होतो, त्यापैकीच एक आहेत अब्जाधीश व रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी.
ते जगातील सर्वात श्रीमंतांपैकी एक असून दरवर्षी कोट्यावधी रुपयांहून अधिक देणगी देतात, तसेच या अब्जाधीशाचा पगार किती असेल, हा उत्सुकतेचा विषय आहे. जगातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांचा वार्षिक पगार किती आहे आणि ते दरवर्षी किती दान करतात, असे प्रश्न अनेकांना पडतात. आज त्याविषयीच आपण जाणून घेऊया…
पगार
रिलायन्स इंडस्ट्रीजने वार्षिक अहवालात सांगितले होते की, मुकेश अंबानी 2008-09 या आर्थिक वर्षापासून वार्षिक 15 कोटी रुपये पगार घेत आहेत. मात्र, 31 मार्च 2021 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात त्यांनी पगार घेतला नाही. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असल्याने मुकेश अंबानी यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी स्वेच्छेने पगार सोडला होता. अंबानी यांच्या पगारात भत्ते आणि कमिशन यांचा समावेश होतो.
मोठे देणगीदार
सन 2021 च्या एका यादीनुसार, मुकेश अंबानी यांनी 2020-21 या आर्थिक वर्षात 577 कोटी रुपये दान केले. देणगीदारांच्या यादीत ते तिसरे भारतीय अब्जाधीश आहेत.
मार्केट कॅप
मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजार भांडवल 17,84,892.43 कोटी रुपये आहे. बाजार भांडवलाच्या दृष्टीने ही भारतातील सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीच्या शेअरची किंमत 2638.45 रुपये आहे, जी एका दिवसाच्या आधीच्या तुलनेत 3.71 टक्के वाढ दर्शवते.
एकूण संपत्ती
मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स पेट्रोकेमिकल्सपासून दूरसंचार उद्योगांपर्यंत सर्व गोष्टींवर वर्चस्व गाजवत आहे. रिलायन्स ही कर्जमुक्त कंपनी आहे, तर अंबानी जगातील 11 व्या क्रमांकाचे श्रीमंत अब्जाधीश आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 94.4 अब्ज डॉलर्स एवढी आहे.