मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोठे उद्योजक नेहमीच विविध प्रकारची खरेदी करत असतात. मग त्यात मालमत्ता असो की अन्य काही. त्यामुळे ते सतत चर्चेत असतात. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी हे अनेकदा त्यांच्या दूरगामी निर्णयांसाठी ओळखले जातात. मुकेश अंबानी अनेकदा असे निर्णय घेतात, जे भविष्यात त्यांच्या व्यवसायासाठी खूप फायदेशीर ठरू शकतात. अलीकडेच, त्यांनी ब्रिटनमध्ये तब्बल १०० दशलक्ष पौंड म्हणजेच १० अब्ज रुपयांहून अधिक किमतीचे सोडियम विकत घेऊन जगाला चकित केले आहे. अंबानींनी १० अब्ज रुपयांचे सोडियम का विकत घेतले, याबद्दल जगातील अनेक जाणकारांनाही आश्चर्य वाटत आहे.
सध्या, स्मार्टफोनपासून इलेक्ट्रिक कारपर्यंत सर्वत्र लिथियम-आयन बॅटरी आहेत. अशा परिस्थितीत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी इंग्लंडमध्ये सोडियम बॅटरी बनवण्यासाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला असेल तर तो खूप दूरगामी निर्णय ठरू शकतो. लिथियमला सोडियम हा उत्तम पर्याय आहे, असे मानले जात आहे. मुकेश अंबानी त्यांच्या पॉवर स्टोरेज गिगाफॅक्टरीसाठी लिथियमपेक्षा सोडियम हा उत्तम पर्याय म्हणून विचार करत आहेत. विशेष म्हणजे पृथ्वीवर सोडियमचे प्रमाण लिथियमच्या तुलनेत ३०० पट जास्त आहे. सध्या जगात इलेक्ट्रिक वाहनांची क्रेझ वाढत आहे आणि त्यामुळे केवळ लिथियमच नाही तर उच्च दर्जाचे निकेल, कोबाल्ट आणि ऊर्जा साठवून ठेवणारी प्रत्येक धातू इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीमध्ये वापरली जात आहे. अशा परिस्थितीत या धातूंच्या किमतीही वाढत आहेत, किंबहुना या वस्तूंची उपलब्धता हळूहळू कमी होत आहे.
अनेक अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, लिथियम-आयन बॅटरी बनवण्यासाठी धातूची मागणी २०३० पर्यंत पाच पटीने वाढू शकते. २०२२ मध्ये बॅटरीच्या किमती वाढण्याची चिन्हे आहेत. अंबानींची प्रमुख कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ७६ अब्ज डॉलरच्या ऊर्जा व्यवसायावर काम करत आहे. तसेच, एका पारंपरिक लेड-अॅसिड बॅटरीइतके स्वस्त आणि ती बनवण्यासाठी वापरलेले साहित्य सहज उपलब्ध असलेल्या तंत्रज्ञानावर काम करत आहेत.
यूकेस्थित उद्यम भांडवल लिस्टर अश्विनी कुमार स्वामी म्हणतात की, जर सर्व बॅटरी निर्मात्यांनी लिथियमवर हक्क घ्यायला सुरूवात केली तर ते फार काळ टिकणार नाही. याशिवाय जगात कोबाल्टचे साठेही फार मोठे नाहीत. त्यामुळे अनेक कंपन्या सोडियमचा विचार करू शकतात. सोडियम आयन बॅटरीबद्दल बोलायचे झाल्यास, प्रति तास १६० – १७० वॅट ऊर्जा प्रति किलोग्रॅम मिळवता येते. नवीन तंत्रज्ञानाच्या आगमनाने, सोडियमची क्षमता ताशी २०० वॅट्सपर्यंत वाढली आहे.