इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – विक्रम किर्लोस्कर यांच्या निधनानंतर आता त्यांची एकुलती एक मुलगी मानसी किर्लोस्कर यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे. मानसी याच किर्लोस्कर कुटुंबाच्या उत्तराधिकारी असतील. अर्थात यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही. विक्रम आणि गीतांजली किर्लोस्कर यांची कन्या मानसी (वय ३२ वर्षे) यांनी त्यांच्या उद्योगात याआधी अनेक मोठ्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत.
टोयाटो – किर्लोस्कर मोटर कंपनीचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर (वय ६४) यांचे मंगळवारी निधन झाले, किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीची ते सदस्य होते, फॉर्च्यूनर इनोव्हा मॉडेल सादर करणारी जपानी टोयाटो मोटर्स भारतात आणण्याचे श्रेय विक्रम किर्लोस्कर यांना जाते. मात्र आता त्यांच्यानंतर किर्लोस्कर कंपनीचा कार्यभार कोण सांभाळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.
विशेष म्हणजे मानसी किर्लोस्कर या किर्लोस्कर सिस्टम लिमिटेडमध्ये एग्जिक्यूटीव्ह डायरेक्टर आणि सीईओ आहेत. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्या वडीलांच्या सोबत काम करू लागल्या. मानस यांनी सन २०१९ मध्ये नोएल टाटा यांचे पुत्र नेविल टाटा यांच्याशी विवाह केला. नेविल टाटा हे रतन टाटा यांची सावत्र भाऊ आहेत. मानसी यांचे पती नेविल ट्रेंट हायपरमार्केट प्रायव्हेट लिमिटेडचे नेतृत्व करतात. वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी त्यांच्याकडे स्वत:च्या योजना आहेत.
महत्वाची गोष्ट म्हणजे किर्लोस्कर सिस्टम्सच्या कार्यकारी निदेशक व सीईओ मानसी किर्लोस्कर यांनी करिअरच्या सुरुवातील मोठे यश मिळवले होते. सन २०१८ मध्ये त्यांची संयुक्त राष्ट्राकडून युवा बिझनेस लीडर म्हणून निवड करण्यात आली होती. मानसी यांनी अमेरिकेतील रोड आयलँड स्कूल ऑफ डिझायनिंगमधून पदवी गेतली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी टोयोटा किर्लोस्कर मोटर मध्ये ३ वर्ष ट्रेनिंग घेतले.
दरम्यान, ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांनी बिझनेस आणि व्यवस्थापन या गोष्टीकडे मोर्चा वळवला. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्या वडिलांसोबत काम करू लागल्या. मानसी यांनी टोयोटाच्या साधीने टोयोटा मटीरियल हॅडलिंग प्रायव्हेट लिमिटेड लॉन्च केले. किर्लोस्कर समूहाच्या एकूण ८ कंपन्या असून त्यांची शेअर बाजारात नोंदणी झाली आहे. या कंपन्यांमध्ये किर्लोस्कर ब्रदर्स, किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड, किर्लोस्कर फेरम इंडस्ट्रीज लिमिटेड, किर्लोस्कर ऑइल इंजिन लिमिटेड, किर्लोस्कर न्यूमेटिक कंपनी लिमिटेड, एनवायर इलेक्ट्रोडाइन लिमिडेट आणि जीजी दांडेकर मशीन वर्क्स लिमिटेडचा समावेश आहे. आता या सर्व कंपन्यांचा कार्यभार मानसी किर्लोस्करकडे येणार आहे.
https://twitter.com/UNinIndia/status/1050327951059775488?s=20&t=YiNsf9-PZbp86IRa7QAJ7Q
Industrialist Manasi Kirloskar Head Business
Vikram Kirloskar