नाशिक – चिकन गुनिया झालेला रुग्ण दीड ते दोन महिने अंग दुखी, सांधी दुखीने त्रस्त असतो. त्यामुळे त्याच्याकडून अधिक शारिरीक श्रमाची अपेक्षा केली जात नाही. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण समोर आले आहे. चिकन गुनियाच्या आजारावर मत केल्यानंतर अवघ्या दोनच महिन्यात थेट आयर्नमॅन ही अतिशय खडतर आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकण्याचा विक्रम महेंद्र छोरिया यांनी केला आहे.
महेंद्र छोरिया हे भगर उद्योजक आहेत. अनेक शारीरीक व्याधी असतानाही त्यांनी व्यायामावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळेच त्यांनी सायकलिंग, रनिंग, स्विमिंगमध्ये ती मिळवली. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियात आयर्नमॅन ही स्पर्धा पूर्ण करुन मोठे यश मिळविले होते. अतिशय खडतर असलेल्या या स्पर्धेत पुन्हा सहभागी होण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, कोरोना संकटामुळे या स्पर्धांचे आयोजनच झाले नाही. दक्षिण अफ्रिकेत दरवर्षी एप्रिल महिन्यात होणारी आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन ही स्पर्धा कोरोनामुळे नोव्हेंबरमध्ये आयोजित करण्यात आली. त्यात सहभागी होण्यासाठी छोरिया हे प्रयत्न करत होते. त्यातच त्यांना दोन महिन्यांपूर्वी चिकन गुनियाची लागण झाली. मोठ्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते त्यातून बाहेर आले आणि त्यांनी त्यांचा सराव सुरू केला.
२१ नोव्हेंबर रोजी दक्षिण अफ्रिका आयर्नमॅन ही स्पर्धा संपन्न झाली. त्यात महेंद्र छोरिया यांनी यश मिळविले आहे. अतिशय प्रतिकुल हवामान असल्याने १५ तास २५ मिनिटात स्पर्धा पूर्ण करण्याचे उद्दीष्ट खेळाडूंना देण्यात आले होते. त्यात छोरिया यांनी ७०० मीटर स्विमिंग, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर रनिंग हे १४ तास ३३ मिनिटात पूर्ण केले. विशेष म्हणजे, समुद्रामध्ये स्विमिंग करायचे होते. तब्बल ७ फुटापेक्षा अधिक उंचीच्या समुद्र लाटा उसळत असताना स्विमिंग करायचे होते. अतिशय खडतर स्वरुपाची ही स्पर्धा मोठ्या जिद्दीने त्यांनी पूर्ण केली आहे. ट्रायथलॉन कोच चैतन्य वेल्हाळ यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.
https://www.facebook.com/103446941470343/posts/375309957617372/
दक्षिण अफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत भारतातून ४ स्पर्धक सहभागी झाले. त्यात बारामती, फलटण येथील स्पर्धकांचा समावेश होता. तर, नाशिकमधून दोघे जण होते. या चारही जणांनी ही स्पर्धा पूर्ण केली आहे. छोरिया यांनी यशाबद्दल कोचसह त्यांचे कुटुंबियांचे आभार मानले आहेत. (बघा, छोरिया यांची मुलाखत – व्याधीग्रस्त ते थेट आयर्नमॅन)