मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – प्रसिद्ध उद्योजक सायरस मिस्त्री हे सायरस मिस्त्री यांचा पालघरजवळील चारोटी येथील भीषण अपघातात मृत्यू झाला. हा अपघात का घडला या कारणांचा विविध पातळ्यांवर शोध घेतल्या जात आहेत. विशेष म्हणजे यासाठी जर्मनी एक विशिष्ट टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती. आता या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे. या अपघातासंदर्भात प्राथमिक अहवाल समोर आला आहे. अपघात झाला तेव्हा कारचा वेग १०० किमी प्रति तास एवढा होता.
सायरस मिस्त्री यांच्या कारचा अपघात रविवारी मुंबई अहमदाबाद हायवेवर झाला. ते अहमदाबादहून मुंबईला येत होते. वाटेत पालघर जवळ त्यांची कार डिव्हायडरवर आदळली. डॉ. अनाहिता पंडोले ( ५५ वर्षे) या कार चालवत होत्या. त्या स्त्री रोग तज्ज्ञ आहेत. त्यांच्या बाजूला समोरील सीटवर पती डेरियस पंडोले होते. पतीचे भाऊ जहांगीर दिनशा पंडोले आणि सायरस मिस्त्री मागील सीटवर बसले होते. अनाहिता आणि त्यांचे पती बचावले. गंभीर जखमी झाले तर सायरस मिस्त्री आणि जहांगीर पंडोले यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे या दोघांनी सीटबेल्ट लावला नव्हता, असे म्हटले जात आहे.
सायरस मिस्त्री हे पंडोल कुटुंबियांसह अहमदाबादहून मुंबईकडे मर्सिडीज कारने येताना झालेल्या या अपघातामध्ये मिस्त्रींसहीत त्यांच्यासोबत जहांगीर पंडोले यांचाही मृत्यू झाला. या अपघाताच्या तपासाचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यानंतर अपघाताला कारणीभूत ठरलेल्या मर्सिडीज बेन्झ जीएलसी गाडीतील डेटा चीप ही जर्मनीला पाठवण्यात आली आहे. मर्सिडीज कंपनीने अहवालात सांगितले आहे की, अपघाताच्या पाच सेकंद आधी ब्रेक दाबण्यात आला होता. यावेळी कारचा वेग ताशी १०० किमी इतका होता.
अनहिता यांनी ब्रेक दाबला तेव्हा कारचा वेग ताशी ८९ किमी वर पोहोचला आणि पुलाला धडक दिली असेही अहवालात म्हटले आहे. तसेच पोलिसांनी कंपनीकडे अनहित यांनी कार ताशी १०० किमी वेगात असताना ब्रेक दाबला की, त्याच्या आधीच दाबला होता ? अशी विचारणा केली होती. तसंच किती वेळा ब्रेक दाबवण्यात आला होता? असेही विचारण्यात आले होते. आता या पुढील माहिती मिळवण्यासाठी, मर्सिडीज कंपनी अपघातग्रस्त कार १२ सप्टेंबरला शोरुममध्ये घेऊन जाणार आहे.
हाँगकाँगमधील एक पथक येऊन या कारची पाहणी करणार असून, त्यानंतर सविस्तर चौकशी अहवाल सोपवला जाईल. हाँगकाँमधील पथकाने व्हिसासाठी अर्ज केला आहे. जर पुढील ४८ तासात व्हिसा मिळाला नाही, तर भारतातील टीम या वाहनाची पाहणी करुन अहवाल सादर करणार आहे. या संदर्भात ठाणे व पालघर आरटीओने आपल्या रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अपघात झाला तेव्हा चार एअरबॅग उघडल्या होत्या. या चारही एअरबॅग पुढील बाजूस होत्या. यामधील एक एअरबॅग चालकाच्या डोक्यापुढे, दुसरी गुडघ्याजवळ आणि तिसरी त्याच्या डोक्याच्या वरच्या बाजूला उघडली होती. चौथी एअरबॅग चालकाच्या बाजूच्या सीटवरील पुढील बाजूला होती, असे म्हटले आहे.
Industrialist Cyrus Mistri Carr Accident Primary Report