ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चारोटी येथील सूर्या पुलाजवळ रविवार दि. ४ सप्टेंबर रोजी झालेल्या अपघातात टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला. अन्य दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या कासा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर त्यांची वापी येथे रवानगी करण्यात आली. या भीषण अपघातात टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. मिस्त्री यांचा पोस्टमार्टमचा प्राथमिक अहवाल जाहीर झाला आहे.
अहवालानुसार, त्याच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय शरीराच्या इतर भागांनाही दुखापत झाली आहे. प्राथमिक अहवालानुसार सायरस आणि त्यांचा मित्र जहांगीर यांचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू झाला आहे. त्याचा व्हिसेराही पुढील तपासासाठी जतन करण्यात आला आहे. खरे म्हणजे हा अपघात नेमका कसा झाला याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एक चूक जीवावर बेतल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सायरस मिस्री आणि त्यांच्या सोबतच्या प्रवाशांनी सीट बेल्ट बांधला नव्हता. त्यामुळेच अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला. सीट बेल्ट न बांधण्याची चूक सायरस आणि त्यांच्यासोबत असलेल्यांच्या जीवावर बेतली आहे. अपघात झाला तेव्हा मर्सिडीज कार (एमएच 47 एबी 6705) गुजरातहून मुंबईकडे जात होती. सूर्या नदीच्या पुलावर येताच चारोटीजवळ दुभाजकाला कार धडकली. अनाहिता पंडोले कार चालवत असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार, या अपघातात सायरस मिस्त्री यांच्या शरीराच्या अंतर्गत अवयवांना गंभीर दुखापत झाली आहे. ज्याला वैद्यकीय परिभाषेत ‘पॉलीट्रॉमा’ म्हणतात. त्यामुळे सायरस मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. या भीषण रस्ता अपघातात चक्काचूर झालेली कार पाहून अंदाज येतो की गाडीचा वेग किती असेल? दुसरीकडे सायरस मिस्त्री यांच्या कुटुंबातील बहुतांश जण परदेशात राहतात, ते रात्री उशिरा मुंबईत पोहोचतील, त्यामुळे मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच सायरस मिस्त्री अपघात प्रकरणाच्या तपासात पालघर पोलीस अपघाताचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. या तपासात पोलीस एका एनजीओचीही मदत घेणार आहेत. ही स्वयंसेवी संस्था महामार्गावरील अपघातांचे विश्लेषण आणि अभ्यास करत असते.
इतकेच नव्हे तर यासोबतच भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी प्रशासनासोबत बारकाईने काम करत आहे. एनजीओचे कर्मचारी पोलिसांसह तपासात सहभागी होतील. या प्रवाशाने सीट बेल्ट घातला नव्हता, त्यांची कार अत्यंत वेगात होती. ड्रायव्हरनं घेतलेल्या चुकीचा निर्णय या अपघातासाठी कारणीभूत ठरला. या आलिशान कारचा वेग इतका होता की तिने पालघर जिल्ह्यातील चारोटी चेकपोस्ट ओलांडल्यानंतर अवघ्या नऊ मिनिटांत २० किमीचे अंतर कापले. अपघाताची माहिती मिळताच कासा पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. सायरस मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला कारने येत होते. त्यांच्या कारमध्ये एकूण चार जण होते. या वर्षी २८ जून रोजी सायरसचे वडील आणि उद्योजक पल्लोनजी मिस्त्री (93) यांचे निधन झाले होते.
Industrialist Cyrus Mistri Accident Death Postmortem Report
Palghar Car Road Highway