सोमवार, सप्टेंबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ब्रिटनमध्ये साकारणार पहिले जगन्नाथ मंदिर… या अब्जाधीशाने दिली तब्बल २५० कोटींची देणगी… आजवरचे सर्वाधिक दान

by Gautam Sancheti
एप्रिल 26, 2023 | 1:03 pm
in इतर
0
FulyXW8WIAMtDfv

 

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – ब्रिटनमधील पहिले जगन्नाथ मंदिर साकार होणार आहे. या मंदिराच्या बांधकामासाठी भारतीय वंशाच्या अब्जाधीशाने तब्बल २५० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. ओडिशाचे रहिवासी विश्वनाथ पटनायक यांनी ही रक्कम मंदिराच्या बांधकामावर काम करणाऱ्या ब्रिटीश धर्मादाय संस्थेला देण्याचे सांगितले आहे.

मंदिराचा पहिला टप्पा पुढील वर्षअखेरीस पूर्ण होणे अपेक्षित आहे. परदेशात मंदिरासाठी दिलेले हे सर्वात मोठे योगदान आहे. इंग्लंडमधील धर्मादाय आयोगाकडे नोंदणीकृत श्री जगन्नाथ सोसायटी (एसजेएस) यूकेने सांगितले की, रविवारी अक्षय्य तृतीयेला यूकेमध्ये झालेल्या पहिल्या जगन्नाथ संमेलनादरम्यान ही घोषणा करण्यात आली.

१५ एकर जमीन
ब्रिटनमधील जगन्नाथ मंदिराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन या कार्यक्रमात बोलताना पटनायक यांनी भाविकांना केले. लंडनमधील ‘श्री जगन्नाथ मंदिरा’साठी सुमारे १५ एकर जमीन खरेदी करण्यासाठी २५० कोटी रुपयांपैकी ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मंदिरासाठी अर्ज
“जमिनीचा एक योग्य तुकडा ओळखण्यात आला आहे आणि सध्या खरेदीच्या अंतिम टप्प्यात आहे आणि मंदिर बांधण्यासाठी परवानगी मिळविण्यासाठी स्थानिक सरकारी कौन्सिलकडे पूर्व नियोजन अर्ज सादर केला आहे,” असे धर्मादाय संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे. मंदिराचे अध्यक्ष डॉ. सहदेव स्वेन म्हणाले की,, हे मंदिर युरोपातील जगन्नाथ संस्कृतीचे प्रतीक आणि जगभरातील हजारो भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करणारे तीर्थक्षेत्र असेल.

कोण आहेत विश्वनाथ पटनायक?
पटनायक हे फिनेस्ट ग्रुप ऑफ कंपनीजचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. अक्षय ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने (EVs), हायड्रोजन लोकोमोटिव्ह इत्यादींमध्ये त्यांची गुंतवणूक आहे. बँकर-व्यापारी बनलेल्या पटनायक यांनी अर्थशास्त्रात एमबीए, एलएलबी आणि बीए केले असल्याचे सांगितले जाते.

२००९पासूनचा प्रवास
अनेक वर्षे बँकिंग क्षेत्रात काम केल्यानंतर पटनायक यांनी २००९ मध्ये उद्योजकतेमध्ये प्रवेश केला. पटनायक यांनी अलीकडेच ओडिशामध्ये ईव्ही-हायड्रोजन ट्रक आणि व्यावसायिक अवजड वाहन निर्मिती प्रकल्पात ५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे. पटनायक यांची गुंतवणूक आरोग्यसेवा, फिनटेक, अक्षय ऊर्जा ते दुबईतील सोन्याच्या रिफायनरी आणि सराफा व्यापारापर्यंत विविध पोर्टफोलिओमध्ये पसरलेली आहे.

https://twitter.com/JagannathaUK/status/1650976583526629381?s=20

Industrialist biswanath patnaik Donate 250 Crore for Jagannath Temple uk

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रिलायन्स जिओने वाढविले टीव्हीचे टेन्शन; बघा, अशी आहे आकडेवारी

Next Post

रजेवर गेलेले एकनाथ शिंदे तातडीने नागपूरकडे.. अमित शहा दुसऱ्यांदा दौऱ्यावर… फडणवीसांचीही उपस्थिती.. काहीतरी घडतंय?

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

doctor
संमिश्र वार्ता

श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रमातून ३.२६ लाख नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी, ६,८६२ नागरिकांनी केले रक्तदान

सप्टेंबर 7, 2025
Pne Photo Chandrakant Dada Patil Adhawa Baithak 13 Jane 2025 2 1920x1280 1
महत्त्वाच्या बातम्या

आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार आता या नावाने दिला जाणार….मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

सप्टेंबर 7, 2025
WhatsApp Image 2025 09 06 at 6.39.57 PM 1024x682 1
महत्त्वाच्या बातम्या

ढोल-ताशांच्या गजरात दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप

सप्टेंबर 7, 2025
GANESH VISRJAN 4 1024x682 1
मुख्य बातमी

गिरगाव चौपाटीवर मुख्यमंत्र्यांचा गणरायाला निरोप… राज्यातील गणेशोत्सवाच्या मिरवणुका शांततेत

सप्टेंबर 7, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने जपून चालवावी, जाणून घ्या, रविवार, ७ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 7, 2025
accident 11
संमिश्र वार्ता

लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वीच मुख्य प्रवेशद्वाराजवळ अपघात…दोन चिमुकल्यांना चिरडून वाहनचालक फरार

सप्टेंबर 6, 2025
daru 1
संमिश्र वार्ता

परराज्यातील विदेशी मद्य वाहतूकप्रकरणी मोठी कारवाई…१ कोटी ५६ लाखाचा मुद्देमाल जप्त

सप्टेंबर 6, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींना वाहन खरेदीचा योग, शनिवार, ६ ऑगस्टचे राशिभविष्य

सप्टेंबर 6, 2025
Next Post
Shinde Shah Fadanvis e1682495513912

रजेवर गेलेले एकनाथ शिंदे तातडीने नागपूरकडे.. अमित शहा दुसऱ्यांदा दौऱ्यावर... फडणवीसांचीही उपस्थिती.. काहीतरी घडतंय?

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011