मुंबई – उद्योगपती अनिल अंबानी आणि अभिनेत्री टीना अंबानी यांचा मुलगा अनमोल याचा साखरपुडा नुकताच झाला आहे. क्रिशा शाह ही अंबानी यांच्या घरची नवी सूनबाई होणार आहे. साखरपुड्याला अत्यंत मोजके मान्यवर उपस्थित होते. अभिनेत्री टीना मुनीम यांनी उद्योजक अनिल अंबानी यांच्याशी विवाह केला. अनमोल हा या दोघांचा मोठा मुलगा आहे. अनमोल आणि क्रिशा या दोघांनाही विविध मान्यवरांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. अमिताभ बच्चन हे सुद्धा त्यापैकीच एक आहेत.
T 4128 – Anmol & Krisha love and congratulations ❤️? Blessings on this togetherness ??? pic.twitter.com/XokBW7Rt08
— Amitabh Bachchan (@SrBachchan) December 14, 2021
अमिताभ यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अनमोल आणि क्रिशा हे दोन्ही अत्यंत आनंदी दिसून येत आहेत. तसेच, दोघेही त्यांची साखरपुड्याची अंगठी सर्वांना दाखवित आहेत. अनमोलने नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला आहे. टीना अंबानी यांनी त्याच्या वाढदिवासाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.