इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा ते अनेक आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर करत असतात. शुक्रवारीही त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक आश्चर्यकारक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यावर लोकांच्या खूप प्रतिक्रिया येत आहेत. आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला व्हिडिओ अवघ्या २९ सेकंदांचा आहे आणि तो पाहिल्यानंतर कळते की आयुष्यात नशीब नावाची एक गोष्ट असते.
२९ सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक माणूस रस्त्यावरून दुकानाकडे वळताना दिसत आहे. मध्यभागी एक गटार आहे. ती झाकलेली असते. परंतु ती व्यक्ती गटार ओलांडताच त्यावरील स्लॅब कोसळतो. धक्कादायक म्हणजे, ती व्यक्ती केवळ नशिब बलवत्तर म्हणून वाचते. नाल्यावरील स्लॅब कोसळतेवेळी ती व्यक्त तेथे असती तर कदाचित ती सुद्धा गटारीत कोसळली असती.
सुदैवाने तो माणूस सुखरूप बचावला आणि त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. नाल्याचा आवाज ऐकून तो माणूस बराच वेळ स्तब्ध उभा राहिला. कदाचित नशिबानेच त्याला कसे वाचवले असेल असा प्रश्न पडला आहे. त्या व्यक्तीची अवस्था अशी झाली होती की तो काही वेळ जिभ बाहेर काढून तिथे उभा राहतो. यानंतर काही जण दुकानातून बाहेर पडतात, त्यांनाही हे पाहून आश्चर्य वाटते. गटारीवरील स्लॅब कोसळण्याची आणि त्या व्यक्तीच्या बचावाची संपूर्ण घटना दुकानाबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तोच हा व्हिडिओ आहे.
https://twitter.com/anandmahindra/status/1555446030883102722?s=20&t=p1yFf5anNrRqhYdMTrCaAw
व्हिडिओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, या माणसाला ब्रह्मांड काय संदेश देत आहे हे शोधण्यात मी वीकेंड घालवणार आहे. तुम्ही त्याच्या जागी असता तर काय विचार करत असता?’ आनंद महिंद्राच्या या लाईनवर अनेक युजर्सनी कमेंटही केल्या आहेत. काही यूजर्स त्यांना उलट प्रश्नही करताना दिसले आहेत.
Industrialist Anand Mahindra Share Thrilling Video