इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एकीचे बळ हे फारमोठे असते. सांघिक खेळामध्ये सर्व खेळाडूंची संघभावना जितकी श्रेष्ठ तितके यशाचा प्रभाव अधिक. हे केवळ लिखित शब्द नाहीत तर तेच सत्य आहे. ज्येष्ठ उद्योगपती आनंद महिंद्रा हे ट्विटरवर अतिशय सक्रीय असतात. उत्कृष्ट संघभावना प्रदर्शित करणारा एक व्हिडिओ महिंद्रा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका फुटबॉल सामन्याचा आहे. टीमवर्कद्वारे एक दोन नाही तर तब्बल ४७ वेळा फुटबॉल आपल्या संघाच्या खेळाडूंकडे पास करतात. आणि परिणामी एक उत्कृष्ट आणि सामना जिंकणारा गोल होतो हे दाखविणारा हा व्हिडिओ आहे. बघा हा अतिशय अप्रतिम व्हिडिओ
https://twitter.com/anandmahindra/status/1548545585598251008?s=20&t=7oWS8kowyophpABJOdgPrw
Industrialist Anand Mahindra Share Excellent Teamwork Video