पुणे (इंडिया दर्पण वृतसेवा) – प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा हे अनेकदा त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. आनंद महिंद्रा असे काही आगळेवेगळे ट्विट करतात किंवा एखादे ट्विट रिट्विट करतात जे वेगाने व्हायरल होऊ लागते. सध्या आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो दक्षिण कोरियाचा आहे, त्यामध्ये कोरियाच्या महामार्गावर सौर यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये उद्योगपतीने नितीन गडकरींनाही टॅग केले आहे. त्यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.
आनंद महिंद्रा यांनी दक्षिण कोरियाच्या वाहतूक व्यवस्थेचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहने जात येत आहेत, परंतु रस्त्याच्या मध्यभागी सौर पॅनेलने झाकलेला सायकल मार्ग आहे. याचा एक फायदा असा आहे की, सायकल चालवणारे नागरिक हे सावलीत सायकल चालवतील आणि उष्णतेपासून वाचतील, त्याच वेळी ते रहदारी देखील टाळतील, तर दुसरीकडे या सोलर प्रणालीमुळे त्या देशातील नागरिकांना स्वच्छ ऊर्जा मिळेल. विशेष म्हणजे आनंद महिंद्रा यांना ही कल्पना आवडली, कारण मोटार वाहन चालवणार्या, तसेच सायकल चालवणार्या प्रत्येकाला अधिक चांगल्या प्रकारे ही योजना समजून घेण्याचा फायदा होत आहे, तसेच सौरऊर्जेचा लाभ मिळत आहे. त्याचप्रमाणे महिंद्राने ट्विटमध्ये गडकरी यांना टॅग केले आहे
https://twitter.com/anandmahindra/status/1498905002122702849?s=20&t=an2cJtFQD-iFOqiL5Gi-Og
आनंद महिंद्रा यांनी लिहिले, “वाह! काय कल्पना आहे, आम्ही अशा प्रकारे सायकल ट्रॅकसाठी कालवे झाकण्याचे काम करत आहोत, परंतु अशा प्रकारे कव्हरेज मोठे होईल. सायकलिंग साठी एक्स्प्रेसवे वापरू नका, तरीही त्यांना वेगळी भेट देण्यासारखे आहे. आणि कोणास ठाऊक, कदाचित या मनोरंजक दृष्टिकोनामुळे सायकलस्वारांची संख्या वाढेल. तसेच दक्षिण कोरियाच्या या कल्पनेने आनंद महिंद्रा प्रभावित झाले. आनंद महिंद्रा यांनी मिझोराम मधील वाहतूकीचे छायाचित्र रिट्विट केले. सोबत लिहिले होते की, काय अप्रतिम चित्र आहे, एकही गाडी रस्ता दुभाजकाच्या पलीकडे नाही. हे प्रेरणादायी आहे तसेच एक चांगला संदेश देते की आपण आपले जीवनमान कसे चांगले बनवतो हे आपल्यावर अवलंबून आहे. कृपया नियमांचे पालन करा, मिझोरामचे नागरिक कौतुकास पात्र आहेत.