इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – उद्योजक आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओज ते आपल्या अकाऊंटवरून शेअर करत असतात. अनेक गुणवान तरुणांच्या विविध प्रयोगांची माहिती ते सातत्याने देत असतात. एवढंच नव्हे, तर अशा अनेक तरुणांना ते नोकरी देण्याची देखील तयारी दर्शवतात. सध्याही त्यांनी अशाच प्रकारे एका तरुणीला नोकरीची ऑफर दिली आहे.
काय आहे व्हिडिओत?
आनंद महिंद्रा यांनी नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. एका तरूणीने चक्क स्टेपलरच्या पिनांपासून एक गाडी बनवल्याचे या व्हिडिओत दिसते आहे. हा व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा म्हणतात, “अशा प्रकारे गाडी तयार करण्याची कल्पना या मुलीला कशी सुचली असेल? तिच्या या कल्पनाशक्तीला सलाम. आता तिने खराखुऱ्या कार बनवण्याच्या कारखान्यात डिझाईनसाठी काम करायला पाहिजे. तिच्या या कल्पनाशक्तीचा आम्हाला नक्कीच फायदा होईल. म्हणूनच आम्ही तिला आमच्या कंपनीत घ्यायला तयार आहोत” असं महिंद्रा म्हणाले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले अनेक व्हिडीओ आनंद महिंद्रा आवर्जून पाहत असतात. अशा अनेक तरुणांच्या टॅलेंटला ते व्यासपीठ देण्याचा प्रयत्न करतात. तर त्यांना प्रोत्साहन म्हणून ते अनेकदा बक्षीसही जाहीर करतात.
https://twitter.com/anandmahindra/status/1677582577371340800?s=20