मुंबई – जुन्या काळातील एका मराठी चित्रपटांमध्ये ‘रंजल्या जीवाची धरी मनी खंत, तोचि खरा साधू तोचि खरा संत’ असे गाणे आहे. इतकेच नव्हे तर आपल्या देशात साधुसंत देखील सांगून गेले आहेत की, गोरगरिबांची अंपग आणि पिडीताची सेवा हाच खरा मानवताधर्म आहे. परंतु प्रत्यक्षात समाजात अंध, अपंग किंवा दिव्यांग व्यक्तींच्या मदतीसाठी त्यातील सामाजिक दायित्व निभावणारे खूप कमी नागरिक असून त्यात काही उद्योजक आहेत.
अशाच प्रकारे एका अपंग व्यक्तीची व्यथा जाणून तसेच त्याने अपंगावर मात केली करित जीवनात यशस्वी कार्य करणाऱ्या या व्यक्तीचे कार्य बघून एका उद्योजकाने त्याला नोकरीची ऑफर दिली आहे. आपल्या ‘अपंगत्वाची’ समस्या बनू न देणाऱ्या दिल्लीतील एका व्यक्तीचा व्हिडिओ पाहून उद्योगपती आनंद महिंद्रा थक्क झाले. यानंतर त्यांनी मेहरौली भागातील या व्यक्तीला त्यांच्या कंपनीत नोकरीची ऑफर पाठवली.
विशेष म्हणजे दोन हात आणि दोन पायांनी अपंग असूनही हा माणूस एका व्हिडिओमध्ये अत्याधुनिक रिक्षा चालवताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल होत आहे. तसेच व्हिडीओमध्ये हा माणूस एका रस्त्यावरून जाणाऱ्याच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. तो त्याच्या वाहनाबद्दल सांगत आहे की ‘ये स्कूटी का इंजिन है (त्यात स्कूटी इंजिन आहे). व्हिडिओ चित्रित करणाऱ्या व्यक्तीच्या विनंतीनुसार, त्या व्यक्तीने हे देखील दाखवले की तो हातपाय न लावता वाहन कसे हलवू शकतो. इतकेच नव्हे तर ‘मला पत्नी, दोन लहान मुलं आणि वृद्ध वडील आहेत, त्यामुळे मी कमावायला बाहेर जातो’, असे या दिव्यांगाचे म्हणणे आहे. तो पाच वर्षांपासून वाहन चालवत असल्याचे त्याने उघड केले. जेव्हा त्याचे चित्रीकरण करणाऱ्याकां कडून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला तेव्हा त्याने फक्त हसून देवाचे आभार मानले.
या माणसाचा व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, आज मी माझ्या टाइमलाइनवर जो व्हिडिओ शेअर करत आहे, तो किती जुना आहे किंवा कुठे आहे, हे मला माहीत नाही, पण या गृहस्थाला पाहून मला आश्चर्य वाटले, ज्यांनी फक्त हेच दाखवले नाही. त्याच्याकडे जे आहे किंवा नाही त्यापेक्षा त्याची क्षमता अधिक आहे.
बघा खालील व्हिडिओ
https://twitter.com/anandmahindra/status/1475408386015612929?s=20
त्यानंतर आनंदने त्याचे भागीदार राम आणि महिंद्रा लॉजिस्टिकला टॅग केले आणि विचारले: “राम, तुम्ही त्याला लास्ट माईल डिलिव्हरीसाठी बिझनेस असोसिएट बनवू शकता का?’ कारण महिंद्रा लॉजिस्टिक्सने जानेवारीमध्ये 6 शहरांमध्ये इलेक्ट्रिक लास्ट-माईल डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 3.57 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसेच हा व्हिडिओ 4600 जणांनी रिट्विटही केला आहे. या ट्विटवर 755 युजर्सनी कोट केले आहे. त्याच वेळी, 24500 हजारांहून अधिक जणांनी त्याला लाइक केले आहे. थोडक्यात, काय तर त्या दिव्यांग व्यक्तीचे शरीर अपंग असले तरी मन अभंग आहे असेच म्हणावे लागेल.