नाशिक – बाजारात टोमॅटोचे भाव कोसळल्यामुळे अनेक शेतक-यांना हा शेतीमाल रस्त्यावर फेकून दिला आहे. उत्पादन खर्च तर सोडाच पण टोमॅटोची तोडणी करण्याचा व वाहतूक करण्याचा खर्च देखील भरून निघत नसल्याचा भयंकर प्रसंग शेतकऱ्यांवर ओढवला आहे. लासलगाव आणि पिंपळगाव या दोन्ही बाजार समित्यांकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली असून हजारोच्या संख्येने टोमॅटोची वाहतूक करणारी वाहने ट्रॅक्टर्स, पिकअप व्हॅन, टेम्पो, मिनीडोर ही एकमेकांना मागे टाकून पुढे जाण्याच्या प्रयत्नात जागीच खोळंबून पडल्याचे चित्र बघायला मिळत आहे. या सर्व परिस्थितीवर इंदुरीकर महाराज यांच्या फॅनने सोशल मीडियार एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यात राजकारण्यांना चिमटे घेतले आहे….
https://www.instagram.com/p/CTD7NgMql8q/?utm_medium=copy_link