सोमवार, सप्टेंबर 29, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेबांचा पुतळा राहणार एवढा उंच; काम अंतिम टप्प्यात

by Gautam Sancheti
मे 19, 2022 | 8:02 pm
in संमिश्र वार्ता
0
4

 

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई येथील इंदू मिल मध्ये उभारण्यात येत असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकातील बाबासाहेबांच्या पुतळा निर्माणाचे कार्य वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक गाझियाबाद(उत्तर प्रदेश) येथील राम सुतार आर्ट कंपनी येथे आज आयोजित करण्यात आली. समितीचे अध्यक्ष, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे आणि समितीच्या सदस्य शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी गाझियाबाद येथे सुरू असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीची पाहणी करून बैठकीत आवश्यक सूचना केल्या.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात बाबासाहेबांचा ३५० फुट उंच पुतळा उभारण्यात येणार आहे. जगविख्यात शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हा पुतळा उभारणार असून गाझियाबाद येथे या पुतळ्याची २५ फुटाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. या प्रतिकृतीच्या आधारावरच मूळ पुतळा उभारण्यात येत असल्याने मंत्रिमंडळ उपसमितीने आज या प्रतीकृतीची पाहणी केली. उभय मंत्री महोदयांनी यावेळी पाहणीनंतर राम सुतार आणि त्यांचे पुत्र अनिल सुतार यांना प्रतीकृतीतील आवश्यक रेखीव बाबींविषयी काही बदल करण्याच्या सूचना दिल्या. या सूचनांनुसार एमएमआरडीए,जे.जे स्कुल ऑफ आर्ट,आय.आय.टी.बॉम्बेची तज्ज्ञ मंडळी आणि स्मारक सल्लागारांच्या मार्गदर्शनाधारे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या प्रतिकृतीत आवश्यक बदल करून मूळ पुतळयाच्या कामाला सुरुवात करावी असे निर्देश श्री. मुंडे यांनी बैठकीत दिले. तसेच, यासाठी राज्यशासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करण्यात येणार असल्याचेही मंत्री द्व्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमीत भांगे, विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे, सहसचिव दिनेश डिंगळे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंते प्रकाश भांगरे, सर जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा.विश्वनाथ साबळे, शापुरजी पालनजी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक उमेश साळुंखे, शशी प्रभु अँड असोशिएट्सचे प्रकल्प सल्लागार अतुल कविटकर आदि यावेळी उपस्थित होते.

श्री. मुंडे यांनी सांगितले की इंदू मिल येथे नियोजित डॉ .बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुधारित संकल्पनेस जानेवारी २०२० मध्ये राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. यानुसार स्मारकातील पुतळयाची उंची वाढवून ३५० फूट करण्यात आली. पुतळा उभारण्यासाठी चवथरा निर्माणाचे कार्य सुरु असून याचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. गाझियाबाद येथील राम सुतार कंपनीत पुतळयाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. यात आजच्या आढावा बैठकीत काही बदल सुचविण्यात आले आहेत. बदलाअंती उपसमितीच्या मंजुरीनंतर मूळ पुतळा निर्माण कार्यास सुरुवात होणार आहे. मार्च २०२४ पर्यंत स्मारक पूर्ण करण्याचे राज्यशासनाने उद्ष्टि आहे व त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याचे श्री मुंडे यांनी अधोरेखित केले.

प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्यशासनाने ११०० कोटींच्या सुधारीत निधीस मंजुरी दिली आहे. राज्यशासनाने मार्च २०२२ अखेर २२८ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात स्मारकासाठी २०० कोटींची तरतूद करण्यात आली असून यातील यापैकी २८ कोटींचा निधी वितरीत करण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वर्ष २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात या स्मारकासाठी ३०० कोटींची आर्थिक तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

इंदू मिल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारण्यास राज्यशासन कटीबध्द असून बाबासाहेबांचा पुतळा या स्मारकाचे खास वैशिष्ट आहे. देश- विदेशातील बाबासाहेबांचे अनुयायी या स्मारकाला भेट देवून त्यांच्या भव्य पुतळयापासून प्रेरणा घेतील, असा विश्वासही उभय मंत्रिमहोदयांनी यावेळी व्यक्त केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सिन्नर – विष्णू वाघ यांनी पाच वर्षांपासून सुमारे दोनशे ते अडीचशे झाडांचे केले संगोपन

Next Post

नाशिक – नवीन प्रभाग ३० मधील रहिवाशांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने केला विविध कामांचा पाठपुरावा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

accident 11
क्राईम डायरी

भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दोन दुचाकीस्वार जागीच ठार…महामार्गावरील घटना

सप्टेंबर 29, 2025
crime 71
क्राईम डायरी

धक्कादायक….दोन भिका-यांमध्ये झालेल्या वादात एकाचा चाकूने भोसकून खून…नाशिकची घटना

सप्टेंबर 29, 2025
संघगीतांमध्ये प्रेरणेच्या भावनेसह भविष्याला दिशा देण्याचे सामर्थ्य
महत्त्वाच्या बातम्या

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते शंकर महादेवन यांनी गायलेल्या संघगीतांचे लोकार्पण

सप्टेंबर 29, 2025
IMG 20250928 WA0555 1
संमिश्र वार्ता

मंत्री छगन भुजबळ यांनी पाण्यात उतरून पूरग्रस्त भागाची केली पाहणी

सप्टेंबर 29, 2025
Screenshot 20250929 071049 WhatsApp
महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन दाखल,पंचवटी परिसरात गोदावरी पूर परिस्थितीचा घेतला आढावा

सप्टेंबर 29, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वादग्रस्त मुद्दे टाळावे, जाणून घ्या, सोमवार, २९ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 29, 2025
Untitled 46
मुख्य बातमी

भारताने आशिया कप जिंकला…अंतिम चुरशीच्या सामन्यात पाकिस्तानचा केला पराभव

सप्टेंबर 29, 2025
Untitled 45
महत्त्वाच्या बातम्या

भारत – पाकिस्तानमधील अंतिम सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग दाखवणार नाही…ठाकरे गटाच्या विरोधानंतर पीव्हीआरचा निर्णय

सप्टेंबर 28, 2025
Next Post
IMG 20220519 WA0140 e1652972224588

नाशिक - नवीन प्रभाग ३० मधील रहिवाशांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट; शिवसेना, सत्कार्य फाउंडेशनने केला विविध कामांचा पाठपुरावा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011