मंगळवार, ऑगस्ट 12, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर स्मारकाची राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडून पाहणी…दिले हे निर्देश

by Gautam Sancheti
एप्रिल 16, 2025 | 7:15 pm
in संमिश्र वार्ता
0
Oplus_131072

Oplus_131072


मुंबई(इंडिया दर्पण वृत्तसेवा)- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यकर्तृत्वाने तरुणांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. त्यांचे शैक्षणिक व सामाजिक कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.

सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि कामकाजाचा आढावा घेतला. चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिस्थळाला भेट देऊन त्यांना वंदन केले.

यावेळी आमदार भाई गिरकर, सहसचिव सोमनाथ बागुल, सह आयुक्त प्रसाद खैरनार, कार्यकारी अभियंता प्रदीप अहिरे, नगरसेविका समिता कांबळे, माजी नगरसेवक शरद कांबळे, राहुल कांबळे, अशोक कांबळे आदीसह, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुंबई महानगरपालिका, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्रीमती मिसाळ म्हणाल्या की, स्मारकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शैक्षणिक आणि सामाजिक इतिहास प्रभावीपणे मांडण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञान, ऑडिओ-विज्युअल माध्यमे, इंटरेक्टिव्ह डिस्प्ले, लेझर शो इत्यादी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. जगातील आणि देशातील विविध स्मारकाचा अभ्यास करून आपला इतिहास आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत कसा पोहोचवता येईल यासाठी नियोजन करावे.

तसेच, स्मारकाच्या मार्गिका, स्वच्छता व सुरक्षा व्यवस्था यावरही लक्ष देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. कामांची गुणवत्ता राखत, इलेक्ट्रॉनिक कामे समांतरपणे (फेजनुसार) सुरू ठेवावी जेणेकरून स्मारक लवकरात लवकर पूर्ण होऊ शकेल, असेही त्यांनी सांगितले. स्मारकात उभारण्यात येणाऱ्या व्याख्यानगृह, ग्रंथालय, सभागृह, विपश्यना केंद्र अशा विविध सभागृहात स्वच्छता आणि सुरक्षा यास प्राधान्य देण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. सचिवांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीमध्ये देखभाल दुरुस्तीसाठींच्या उपाययोजनांबाबत निर्णय घ्यावेत अशा सूचनाही राज्यमंत्री श्रीमती मिसाळ यांनी दिल्या.

यावेळी समितीतील सदस्य, कार्यकारी अभियंते आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी कामाची सद्यस्थिती जाणून घेतली व आवश्यक त्या सुधारणा सुचवल्या.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तमाशा व कलाकेंद्र कलावंतांच्या तक्रारी निवारणासाठी समिती गठित….

Next Post

नाशिक जिल्हा परिषदमध्ये इंटेलिजेन्ट वर्क मॅनेजमेंट सिस्टिम कार्यान्वित…या प्रणालीचे हे आहे फायदे

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
IMG 20250416 WA0339

नाशिक जिल्हा परिषदमध्ये इंटेलिजेन्ट वर्क मॅनेजमेंट सिस्टिम कार्यान्वित…या प्रणालीचे हे आहे फायदे

ताज्या बातम्या

image002JAHI e1754963003729

मोठी भेट…३५ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्‍ये ३ हजार ९०० कोटी रुपये या कारणासाठी जमा

ऑगस्ट 12, 2025
IMG 20250811 WA0508 1

नाशिकमध्ये महिंद्रा नवीन मेगा प्रकल्प उभारणार….मंत्री उद्योगमंत्री उदय सामंत यांची निमात घोषणा

ऑगस्ट 12, 2025
Indian Flag

स्वातंत्र्यदिनाचा शासकीय कार्यक्रम सकाळी ९.०५ वाजता…राजशिष्टाचार विभागाकडून हे निर्देश जारी

ऑगस्ट 12, 2025
Untitled 14

नाशिक जिल्हा ग्रामविकास प्रमुख भीमराम गारे यांचे निधन…पंतप्रधान नरेंद्र मोदींसह या मोठया व्यक्तींबरोबर केले संघाचे प्रचारक म्हणून कार्य

ऑगस्ट 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रांरीकडे दुर्लक्ष करू नका, जाणून घ्या, मंगळवार, १२ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 11, 2025
trump 1

अमेरिकेने लावलेले आयात शुल्क व कापड निर्यात धोरण व सद्यस्थिती नेमकी काय आहे…

ऑगस्ट 11, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011