इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंदूरमध्ये रामनवमीच्या दिवशी मोठी दुर्घटना घडली. स्नेह नगरजवळील पटेल नगर येथील श्री बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात हवनानंतर कन्यापूजन सुरू होते. यादरम्यान विहिरीचे छत पडले आणि तेथे उपस्थित 50 हून अधिक लोक त्यात पडले. या अपघातात आतापर्यंत ३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तीन जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. अजूनही शोधकार्य सुरू आहे. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची चिन्हे आहेत.
महू येथील तीन वेगवेगळ्या टीममधील सुमारे 70 लष्कराचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. गुरुवारी रात्री उशिरा आणखी सात मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापूर्वी 11 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. बचावकार्य सुरू आहे. आणखी काही लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा, इंदूरचे जिल्हाधिकारी आणि मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. मृतांना 5 लाख आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. दुसरीकडे, अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अचानक काय झाले ते कोणालाच समजले नाही. तरीही स्थानिक लोक सक्रिय झाले आणि त्यांनी दहा जणांना बाहेर काढले. जखमींना ऍपल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे.वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी आहेत. मदत आणि बचाव कार्याला वेग आला आहे. त्याचबरोबर मंदिराशेजारी राहणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे की, पायरीची विहीर बेकायदेशीरपणे बांधण्यात आली आहे, याबाबत अनेकवेळा प्रशासनाकडे लेखी तक्रारही करण्यात आली आहे.
Indore Temple Accident Death Toll 35 Rescue Operation Going on