रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

असे आहे इंदूरचे ‘स्वच्छता मॉडेल’; …म्हणून सलग सहाव्यांदा देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान

by Gautam Sancheti
ऑक्टोबर 6, 2022 | 5:12 am
in राष्ट्रीय
0
FeJD 5tUcAACJgu

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – स्वच्छ सर्वेक्षणाचा निकाल नुकताच लागला आहे. यात मध्य प्रदेशमधील इंदूर हे सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. या शहरात कचर्‍याचे व्यवस्थापन नेमके कसे केले जाते ते आपण पाहूया.

केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर शहराने प्रथम क्रमांक कायम राखला, तर सुरत आणि नवी मुंबई यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. यासोबतच महाराष्ट्र देशातील तिसरे स्वच्छ राज्य ठरले. ‘स्वच्छ भारत मिशन (नागरी)’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२२’चा निकाल शनिवारी जाहीर करण्यात आला. ‘स्वच्छतेबाबतची उत्तम कामगिरी’ या श्रेणीत मध्य प्रदेशने पहिला नंबर कायम राखला. तर छत्तीसगड आणि महाराष्ट्र अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची स्वच्छ राज्ये ठरली.

तुम्हाला ठाऊक आहे का? २०१६ मध्ये स्वच्छता सर्वेक्षणात इंदूर हे २५ व्या क्रमांकावर होते. त्यानंतर सलग सहावेळा या शहराने भारतातील सर्वात स्वच्छ शहर हा मान पटकावला आहे. इंदूरमधील या बदलांची कहाणी उल्लेखनीय आहे. इंदूर हे भारतातील पहिले कचरामुक्त शहरही आहे. इंदूर शहर कचर्‍याचे व्यवस्थापन नेमके कसे करते हे माहीत आहे का?

निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण किती?
जवळपास ३५ लाख लोकसंख्या असलेल्या इंदूर शहरात दररोज सरासरी १ हजार ९०० टन कचरा घरोघरी जमा होतो. यामध्ये १२०० टन सुका कचरा आणि ७०० टन ओला कचरा निर्माण होतो. २०१५ मध्ये इंदूर शहरात सुरुवातीस केवळ दोन प्रभागतच कचराकुंडय़ा पूर्णपणे हटवून घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यात आले. ही यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती. नागरिकांच्या प्रतिसादानंतर पूर्णवेळ आणि सर्वच वॉर्डात ही संकल्पना राबवण्यात येत आहे. आणि आता इंदूरने सलग पटकावलेल्या नंबरमुळे ती यशस्वी देखील झाल्याचे दिसत आहे. आजमितीस जवळपास संपूर्ण इंदूर शहर कचराकोंडीमुक्त झाले असून शहराच्या वातावरणातील प्रदूषणही प्रमाणात घटले आहे. साधारणपणे संपूर्ण देशात कचऱ्याचे दोन भागात वर्गीकरण केले जाते. एक म्हणजे ओला कचरा आणि दुसरा सुका. परंतु इंदूरमध्ये कचऱ्याचे सहा श्रेणीत वर्गीकरण केले जाते आणि हेच इंदूरच्या यशाचे गमक आहे.

तीन शिफ्टमध्ये स्वच्छता
इंदूर महापालिकेचे स्वच्छता विभागाचे अधीक्षक महेश शर्मा यांनी या संदर्भात माहिती देताना सांगितले की, महापालिकेकडे ८५० वाहने आहेत जी घरोघरी आणि व्यावसायिक आस्थापनांमधून दररोज कचरा गोळा करतात. हा कचरा गोळा करतानाच तो सहा प्रकारात विभागला जातो. यात ओला, इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक, नॉन-प्लास्टिक, बायोमेडिकल आणि धोकादायक स्वरूपाचा कचरा असतो. वेगवेगळ्या स्वरूपाच्या कचऱ्यासाठी वाहनामध्ये स्वतंत्र कप्पे असतात. सॅनिटरी नॅपकिन्स हे विशिष्ट कप्प्यातच टाकले जातात. हे शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तब्बल ८ हजार ५०० स्वच्छता मित्र कार्यरत आहेत. जे तीन शिफ्टमध्ये काम करतात. अशी देखील माहिती महेश शर्मा यांनी दिली. इंदूर शहराच्या कचरा विल्हेवाट करण्याच्या प्रक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे बायो सीएनजी प्लांट. शहरातून गोळा करण्यात आलेल्या ओल्या कचऱ्यावर हा प्लांट चालतो. हा आशियातील सर्वात मोठा प्लांट असल्याचं अधिकारी सांगतात. विशेष म्हणजे यातून मोठा महसूलही निर्माण होतो.

कचऱ्याची विल्हेवाट करून कोट्यवधी रुपयांचा लाभ
व्यावसायिक सीएनजीच्या तुलनेत पाच रुपये स्वस्त पडणाऱ्या या बायोसीएनजीवर जवळपास १५० सिटी बस चालवतात. गेल्या वर्षात इंदूर महापालिका प्रशासनाने कचऱ्याच्या विल्हेवाटीतून १४.४५ कोटी रुपये कमावले. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कार्बन क्रेडिटच्या विक्रीतून साडेआठ कोटी आणि खासगी कंपनींकडून वार्षिक प्रीमियम म्हणून २.५२ कोटी रुपये मिळालेले आहेत. याशिवाय इंदूरमधील सांडपाण्यावरही तीन विशेष प्लांटमध्ये प्रक्रिया केली जात आहे आणि या पाण्याचा २०० सार्वजनिक उद्याने, शेतात व बांधकामांसाठी पुन्हा वापर केला जात आहे.

Indore Cleanest City in India Cleanliness Model

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दसरा मेळाव्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे असे आहे जंगी नियोजन; शिंदे गटाला शह देणार

Next Post

राज्य सरकारने सुरू केलेली ‘नदी परिक्रमा’ आहे तरी काय? ती कशी असेल? त्याचे फायदे काय? घ्या जाणून सविस्तर…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींच्या घरामध्ये आनंदी वातावरण असेल, जाणून घ्या, रविवार, १४ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 13, 2025
crime 13
क्राईम डायरी

स्टोव्हच्या भडक्यात गंभीर भाजलेल्या ८५ वर्षीय महिलेचा मृत्यू

सप्टेंबर 13, 2025
crime 88
क्राईम डायरी

भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी रोकडसह सोन्याचांदीचे दागिने केले लंपास…जेलरोड भागातील घटना

सप्टेंबर 13, 2025
prakash mahajan
महत्त्वाच्या बातम्या

मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला जय महाराष्ट्र…सांगितले हे कारण

सप्टेंबर 13, 2025
crime1
क्राईम डायरी

चेकिंग सुरू असल्याचो सांगत तोतया पोलीसांनी महिलेचे दागिणे केले लंपास

सप्टेंबर 13, 2025
G0p 0 naAAAO81J 1 e1757735154455
संमिश्र वार्ता

युपीआयच्या माध्यमातून सोमवारपासून दिवसाला इतक्या लाखापर्यंतचे व्यवहार करता येणार

सप्टेंबर 13, 2025
GST 5
संमिश्र वार्ता

वस्तू व सेवा कर संकलनात महाराष्ट्राचा २१ टक्के वाटा.. इतक्या लाख कोटीचा आहे आकडा

सप्टेंबर 13, 2025
Untitled 17
राज्य

या उपक्रमात दहा लाखाहून अधिक नागरिकांची मोफत नेत्र तपासणी, चष्मेवाटप, शस्त्रक्रिया व औषधोपचार

सप्टेंबर 13, 2025
Next Post
02 1140x570 1

राज्य सरकारने सुरू केलेली 'नदी परिक्रमा' आहे तरी काय? ती कशी असेल? त्याचे फायदे काय? घ्या जाणून सविस्तर...

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011