नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – इंडोनेशियातील पिटी बेनुआ ग्रीन एनर्जी या कंपनीने त्यांच्या उद्योगाचा पुढील विस्तार नाशकात करण्याची तयारी दर्शविली आहे,अशी माहिती निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी दिली. या कंपनीची भारतातील पहिलीच गुंतवणूक नाशकात येणार आहे.
इंडोनेशिया येथील कायम रहिवासी व पिटी बेनुआ ग्रीन एनर्जी कंपनीचे संचालक डी रवि व कंपनीचे भारतातील व्यवसाय विकासक सचिन पाटील यांनी नाशिक दौऱ्यात निमा कार्यालयात भेट देऊन तेथील कामकाजाची पाहणी केली. या कंपनीचा सिंगापूर, इंडोनेशिया, मलेशिया येथे उद्योग आहे. आमच्या कंपनीचा पुढील विस्तार आम्हाला भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात करावयचा आहे इंडोनेशिया व चायनाचे असलेले संबंध पाहता त्यांना चायना मधून घेत असलेले सर्व उत्पादने महाराष्ट्र आणि नाशिक मध्ये सर्व काही मिळू शकेल अशी माहिती यावेळेस बेळे यांनी दिली.
एनर्जीशी संबंधित त्यांचे उत्पादन असल्यामुळे नाशिकमध्ये होत असलेली सीपीआरआय टेस्टिंग लॅब तसेच नाशिक मध्ये उपलब्ध असलेल्या सर्व इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक,ऑटोमेशनच्या, कंपन्यांची विस्तृत माहिती यावेळेस उपस्थित उद्योजकांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांना करून दिली, यावेळेस डी रवी यांनी आम्ही आता अस्तित्वात असलेल्या कंपन्यांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी चे मशिनरी घेऊन त्यामध्ये गुंतवणूक करून त्या द्वारे आमचे उत्पादन बनवून घेऊ किंवा एखाद्या कंपनीशी जॉईंट वेंचर सुद्धा आम्ही करू शकतो तसेच आम्हालाही स्वतःचा आमचा इथे कारखाना उभारायचा आहे असे आपल्या बोलण्यामध्ये सांगितले, त्यासाठी आम्ही जागेचा शोध घेत आहोत असे डी. रवी यांनी निदर्शनास आणले असता धनंजय बेळे यांनी त्यांना नाशकात हा विस्तार करावा अशी गळ घातली.
नाशिक मध्ये उद्योगधंद्यांसाठी अनुकूल वातावरण आणि हवामान आहे.येथे कुशल मनुष्यबळ तसेच प्रशस्त जागाही उपलब्ध होईल. दळणवळणाच्यादृष्टीने नाशिकचा राज्यात अग्रक्रम लागतो.येथे एअर कनेक्टिव्हिटीसुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला येथे कोणतीच अडचण येणार नाही.नाशकात तुम्ही विस्तार केल्यास नाशिककरांच्यादृष्टीने ही बाब निश्चितच भूषणावर ठरेल,असे बेळे यांनी पटवून दिले असता डी रवि यांनी नाशकात उद्योगाचा विस्तार करण्याचे आश्वासन दिले.आपण नाशकात आल्यास आपले स्वागतच राहील आपणास आवश्यक ती सर्व निमशासकीय,शासकीय व इतरही मदत निमा तर्फे केली जाईल असे बेळे यांनी त्यांना आश्वस्त केले. त्यांना त्यांच्या उद्योगासाठी उपलब्ध असलेल्या योग्य जागांची माहिती सुद्धा यावेळेस देण्यात आली व त्यामधून लवकरच जागेची निवड करून पडताळणी करून आम्ही पुढील आवश्यक ती कार्यवाही करू,असे डी रवि पुढे म्हणाले.
प्रारंभी बेळे यांच्या हस्ते आणि निमा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत डी रवि आणि पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व निमाच्या विविध उपक्रमांची तसेच नाशकात कार्यरत असलेल्या नामांकित कंपन्यांची तसेच आगामी काळात नाशकात मोठ्याप्रमाणात गुंतवणूक करण्याची ज्यांनी घोषणा केली त्याची माहिती विशद केली.
डी.रवी यांच्याशी व्यावसायिक संबंध असलेले उद्योजक मंगेश काठे यांनी डी.रवी यांचा परिचय करून दिला. बऱ्याच कालावधीनंतर परदेशी गुंतवणूक नाशिक मध्ये येण्याची शक्यता निर्माण झाल्याने उपस्थित निमा सभासद व उद्योजकां मध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमास निमाचे मानद सचिव राजेंद्र अहिरे,खजिनदार विरल ठक्कर,कार्यकारी सदस्य व स्टार्टअपचे मेंटोर श्रीकांत पाटील, गोविंद झा,सी.एस.सिंग, संजय सोनावणे, ऋग्वेद काठे,आदी उद्योजक उपस्थित होते
Indonesian Company Soon Investment in Nashik