इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यानंतर झालेल्या हिंसाचारात मृतांची संख्या १७४ च्या पुढे गेली आहे. तर शेकडो लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. इंडोनेशियाच्या फुटबॉल संघटनेने या भीषण हिंसाचाराबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच पुढील एक आठवड्यासाठी या सामन्यावर बंदी घालण्यात आली आहे. या घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. एका सामन्याने हिंसाचाराचे कसे भयंकर रूप धारण केले आणि शेकडो मृतदेह मैदानात टाकण्यात आले याचे व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाले आहेत.
शनिवारी रात्री पूर्व जावा येथील मलंग रीजन्सी येथील कंजुरुहान स्टेडियमवर इंडोनेशियन लीग BRI लीग १ चा फुटबॉल सामना होता. त्यानंतर ही घटना घडली. क्षेत्राचे पोलीस प्रमुख निको अफिन्टा यांनी सांगितले की, अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यातील सामन्यानंतर पराभूत झालेल्या बाजूच्या समर्थकांनी खेळपट्टीवर हल्ला केला. त्यानंतर अधिकाऱ्यांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली.
https://twitter.com/SCMPNews/status/1576459721308983296?s=20&t=voARkrUInXhwxk21zU89Qw
हल्लेखोरांना शांत करण्यासाठी पोलीस पथकाला अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला. यानंतर मैदानात चेंगराचेंगरी झाली. गुदमरल्याने अनेकांचा मृत्यूही झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये मलंगमधील स्टेडियमच्या खेळपट्टीवर लोक धावताना दिसत आहेत. या हिंसाचारात मृतांचा आकडा १७४ वर गेला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.
फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडोनेशिया (PSSI) ने एक निवेदन जारी करून या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आणि खेळानंतर काय घडले याचा तपास सुरू करण्यासाठी एक संघ मलंगला रवाना झाला आहे. PSSI ने निवेदनात म्हटले आहे की, “PSSI ला कंजुरुहान स्टेडियममधील अरेमा समर्थकांच्या कृत्याबद्दल खेद वाटतो. आम्ही दिलगीर आहोत आणि पीडितांच्या कुटुंबियांची आणि घटनेत सहभागी असलेल्या सर्व पक्षांची माफी मागतो. यासाठी PSSI ने तात्काळ एक तपास पथक तयार केले आणि ताबडतोब रवाना केले..”
https://twitter.com/SkySportsNews/status/1576480279715356672?s=20&t=voARkrUInXhwxk21zU89Qw
Indonesia Football Match Riot 174 Death Reported