इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रांची : मनुष्य प्राण्याच्या मनात प्रेम, आपुलकी, त्याग व जिव्हाळा या चांगल्या भावना असतात, तसेच द्वेष, मत्सर, स्वार्थ, संताप आणि क्रोध यादेखील वाईट भावना असतात, त्यामुळे स्वार्थापायी माणूस कोणत्याही स्तराला जाऊ शकतो, त्यातूनच मग एकमेकांचा जीव घेण्याला देखील कोणी मागे पुढे पाहत नाही. मनुष्य मेल्यावर खाली ( राखेशिवाय )काही शिल्लक राहत नाही किंवा वर( स्वर्गात ) तो काहीही घेऊन जात नाही, मात्र एखाद्या जमिनीच्या तुकड्यासाठी स्वार्थासाठी देशभरात अनेक ठिकाणी रोजच वाद -भांडणे, मारामाऱ्या, हाणामाऱ्या होताना दिसून येतात .झारखंडमधील बोकारो शहरात देखील अशीच एक घटना घडली. शेजारी शेजारी राहणाऱ्या कुटुंबामध्ये ही घटना घडली, शेजारच्या गुंड प्रवृत्तीच्या २० जणांनी एका महिलेच्या घरावर हल्ला करून तोडफोड करीत त्या महिलेवर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले या भयानक घटनेमुळे केवळ बोकारो जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण झारखंड राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
अगदी माणुसकीला लाजवेल अशी घटना समोर आली आहे. बोकारो जिल्हयात शिवंदीह डुमरो या गावात जमिनीच्या वादातून २० हल्लेखोरांनी एका महिलेवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिल्याची ही घटना संतपाजनक आहे. जमिनीच्या वादातून महिलेला असा हा प्रकार घडला. या वादातून हल्लेखोरांनी इतक्या टोकाचे पाऊल उचलले की, रस्त्याच्या मधोमध उघडपणे ही घटना घडली. ही महिला यात गंभीररित्या भाजली. त्यानंतर काही लोक तिच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांनी या महिलेला तातडीने एका शासकीय रुग्णालयात दाखल केली. पण, ती महिला ८० टक्के भाजली नंतर तीचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
जमिनीच्या वादातून एवढी मोठी शिक्षा
पीडित अमिषा (३५) यांचा मुलगा मुजाब अली (१७) सध्या राहत असलेल्या घराच्या जमिनीवरून करमा मांझी यांच्याशी वाद सुरू आहे. याबाबत अनेकदा पंचनामेही झाले. करमा मांझीकडून अमिषा परवीन यांच्यावर घर व जमीन रिकामी करण्यासाठी दबाव आणला जात होता. त्यानंतर भर दुपारी अनेकांनी जबरदस्तीने त्यांच्या घरात घुसून तोडफोड केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.
Outrageous… first ransacked the house… then burnt the woman alive with kerosene..