इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई – ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राज्यात कुठे काय चाललेय यावर त्यांचे बारिक लक्ष असते. एखादी घटना कानावर पडली की लगेच ते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात. अलीकडेच नागपुरात घडलेल्या एका घटनेवरून त्यांनी पुन्हा एकदा फडणवीसांवर टीका केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातील निवासस्थानी शहरातील पोलीस अधिकारी आणि एका भाजप पदाधिकाऱ्यामध्ये वाद झाला. या वादातून भाजपच्या पदाधिकाऱ्याने पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली. या घटनेचा व्हिडियो सोशल मिडियावर व्हायरल झाला आणि तीच संजय राऊत यांच्यासाठी मोठी संधी ठरली. ‘एक्स’ अकाउंटवर संजय राऊत म्हणाले यांनी या घटनेचा व्हिडियो शेअर केला आहे. ‘हे चित्र महाराष्ट्राची दुर्दशा दाखवणारे आहे. मुक्काम पोस्ट, नागपूर. उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे देवगिरी निवासस्थान. पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना भाजपा युवा शहर प्रमूख पुष्कर पोशेट्टीव याने उघड धक्काबुक्की केली. खाकी वर्दीच्या कॉलरला हात घातला. महाराष्ट्र इतका हतबल आणि लाचार कधीच झाला नव्हता,’ असे संजय राऊत या पोस्टमध्ये म्हणतात. या घटनेवर विरोधक व्यक्त होऊ लागले आहेत. विशेषतः ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी ठरत आहे.
सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही या घटनेवरून राज्य सरकार व देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या पदाधिकारी पुष्कर पोशेट्टीव पोलीस उपायुक्तांच्या अंगावर गेले आहेत. ही बातमी दाबण्याचा प्रयत्न गृहमंत्रालयाकडून करण्यात आला. गृहमंत्र्यांच्या घरासमोरच भाजपाच्या पदाधिकाऱ्यांकडून ही गुंडगिरी होत असेल, तर सर्व सामान्य नागरिकांवर काय अत्याचार करण्यात येत असतील, याचं उदाहरण म्हणजे ही घटना आहे, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.
BJP office bearer beat up police officer… outside Fadnavis’s house… action will be taken?